उद्योगमित्र पुरस्काराने भागवत सन्मानित
By Admin | Updated: August 18, 2015 00:45 IST2015-08-18T00:45:42+5:302015-08-18T00:45:42+5:30
१५ आॅगस्ट रोजी पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांच्या हस्ते समर्थ उद्योजक मिताली भागवत यांच्यावतीने अभय भागवत यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

उद्योगमित्र पुरस्काराने भागवत सन्मानित
भंडारा : १५ आॅगस्ट रोजी पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांच्या हस्ते समर्थ उद्योजक मिताली भागवत यांच्यावतीने अभय भागवत यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
यावेळी त्यांना शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, नगराध्यक्ष बाबूराव बागडे, जिल्हाधिकारी धीरजकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिल्लारी, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक दिलीप गुरलवार यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)