सावधान!, अन्यथा स्मशानभूमीतही अंत्यसंस्कारासाठी करावी लागेल प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:34 IST2021-04-06T04:34:28+5:302021-04-06T04:34:28+5:30
भंडारा जिल्ह्यात १ एप्रिलला एकाचा कोरोनाने मृत्यू झाला, २ एप्रिलला तिघांचा मृत्यू, ३ एप्रिलला चार जणांचा मृत्यू झाला तर ...

सावधान!, अन्यथा स्मशानभूमीतही अंत्यसंस्कारासाठी करावी लागेल प्रतीक्षा
भंडारा जिल्ह्यात १ एप्रिलला एकाचा कोरोनाने मृत्यू झाला, २ एप्रिलला तिघांचा मृत्यू, ३ एप्रिलला चार जणांचा मृत्यू झाला तर ४ एप्रिलला पुन्हा एकाचा कोरोनाने मृत्यू झाला.
................................यासोबतच भंडारा शहरात नैसर्गिक कारणांनी मृत्यू झालेल्यांची संख्या नऊ आहे. १ एप्रिलला दोघांचा मृत्यू झाला, ३ एप्रिलला दोघांचा मृत्यू, ४ एप्रिलला एकाचा मृत्यू झाला तर काल ५ एप्रिल रोजी चौघांचा मृत्यू झाला. ...........................................
.त्यामुळे मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. आतापर्यंत भंडारा जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा २० हजार ८६१ वर पोहोचला आहे. त्यातही भंडारा शहर व तालुका हिटलिस्टवर असल्याचे दिसून येते. सर्वाधिक रुग्ण हे भंडारा तालुक्यात असून, आतापर्यंत नऊ हजार ६१ पॉझिटिव्ह रुग्ण भंडारा तालुक्यात आढळून आले आहेत. त्यानंतर मोहाडी, तुमसर, पवनी, लाखणी, साकोली, लाखांदूर असे संपूर्ण जिल्ह्यात आतापर्यंत २० हजार ८६१ पॉझिटिव्ह रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात मृतांचा आकडा ३५२ च्या वर पोहोचला आहे. त्यामुळे पुन्हा सर्व नागरिकांनी एकदा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
बॉक्स
नगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागातील नोंदीतही वाढ
१ भंडारा नगरपरिषद हद्दीतील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने भंडारा शहरात १ एप्रिल ते ५ एप्रिलपर्यंत ९ जणांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
२ यासोबतच दररोज जन्म आणि मृत्यूची नोंद करण्याकरिता अनेक जण येथे येत आहेत. आता सर्व कामकाज ऑनलाइन झाल्याने अनेकदा नागरिकांना येथे नाेंदीसाठी प्रतीक्षा करावी लागते.
३ भंडारा नगरपरिषदेत दररोज किमान ५० ते ६० जण जन्माचे दाखले तसेच जन्म-मृत्यूची नोंद करण्यासाठी येत असतात. त्यामुळे येथे विशेष उपाययोजनेचीही गरज आहे.
बॉक्स
दररोज तीन ते चार जणांवर होतात अंत्यसंस्कार
भंडारा शहरात दोन स्मशानभूमी आहेत. त्यात एक पूर्वीपासूनच असलेली वैनगंगा नदी घाटावरील स्मशानभूमी तर दुसरी कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गालगत गिरोला हद्दीत असलेली नवीन कोविड स्मशानभूमी आहे. या ठिकाणीही कधी एक तर कधी तीन ते चार जणांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्यामुळे आता नागरिकांनी अंत्यविधीसाठी जातानाही कुठेही गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. अनेकदा भावनावश होऊन अनेक नातेवाईक व इतरही मयतीचा कार्यक्रम आहे, गेलेच पाहिजे म्हणून हजेरी लावतात; मात्र वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विचार करण्याची गरज आहे.