शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

खबरदार! धुळवडीत गोंधळ घालाल तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2022 05:00 IST

शांततेत होळी व धुळवड साजरी करण्याचे आवाहन केले. मात्र, त्यानंतरही अनेक जण रस्त्यावर धुळवड साजरी करण्याची शक्यता आहे. त्यासाठीच पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात चार उपविभागीय पोलीस अधिकारी, १७ पोलीस निरीक्षक, ३४ पोलीस उपनिरीक्षक, ९९५ पोलीस कर्मचारी, ३०० होमगार्ड यांचा जिल्हाभर बंदोबस्त राहणार आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाच्या सावटानंतर तब्बल दोन वर्षांनी धुळवड साजरी करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे सर्वांनीच धुळवड धूमधडाक्यात साजरी करण्याचा बेत आखला आहे. मात्र, रस्त्यावर गोंधळ घालून धुळवड साजरी करीत असाल तर सावधान. धुळवडीच्या दिवशी पोलिसांचा सर्वत्र वाॅच राहणार असून जिल्हाभर १४०१ पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे.कोरोना संकटामुळे दोन वर्षे घरात बसूनच सण-उत्सव साजरे करावे लागले. होळीचा सण उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. धुळवडीच्या दिवशी तर रंगांची उधळण केली जाते. मात्र, या सणात अनेक जण मद्य प्राशन करून गोंधळ घालतात. शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणतात. अशा गोंधळ घालणाऱ्या तरुणांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या उपस्थितीत बुधवारी शांतता समितीची बैठक झाली. या बैठकीत शांततेत होळी व धुळवड साजरी करण्याचे आवाहन केले. मात्र, त्यानंतरही अनेक जण रस्त्यावर धुळवड साजरी करण्याची शक्यता आहे. त्यासाठीच पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात चार उपविभागीय पोलीस अधिकारी, १७ पोलीस निरीक्षक, ३४ पोलीस उपनिरीक्षक, ९९५ पोलीस कर्मचारी, ३०० होमगार्ड यांचा जिल्हाभर बंदोबस्त राहणार आहे. यासोबतच पोलीस नियंत्रण कक्षात चार पोलीस निरीक्षक, पाच सहायक पोलीस निरीक्षक, १३ महिला पोलीस शिपायांसह २९ पोलीस कर्मचारी राखीव आहेत. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल सज्ज झाला आहे.नागरिकांनी होळी व धुळवड साजरी करताना कुठेही शांतता भंग होणार नाही, दुसऱ्यांना त्रास होणार नाही. अशा पद्धतीने होळी साजरी करावी. वाहन मद्यप्राशन करुन चालवू नये, असे आवाहन केले आहे.

धुलिवंदनासाठी प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना- कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी कोरोना संपला नाही. त्यामुळे होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी अगदी साधेपणात साजरी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.- कोरोना संक्रमणामुळे धुळवडीला शक्यतो गर्दी न करता कोरोना नियमांचे पालन करून सण साजरा करावा. एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, गुलालाची उधळण करताना कोरोना प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घ्यावी. 

होळी, धुळवड आणि रंगपंचमी आनंदात आणि शांततेत साजरी करावी. कुणीही रस्त्यावर गोंधळ घालू नये. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. धुळवडीला गोंधळ घालणाऱ्यांवर वाॅच ठेवण्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी.-वसंत जाधव,  जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा

वाॅशआऊट मोहिमेत ६२ ठिकाणी धाडी- होळीच्या पर्वात मोठ्या प्रमाणात दारू गाळली जात असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनात वाॅशआऊट मोहीम राबविण्यात आली. चार दिवसात ६२ ठिकाणी गावठी दारू अड्ड्यांवर धाडी मारुन ३ लाख ९७ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पवनी, अड्याळ, जवाहरनगर, भंडारा, मोहाडी, आंधळगाव, तुमसर, सिहोरा, साकोली, लाखनी, पालांदूर, लाखांदूर, गोबरवाही, दिघोरी, कारधा, वरठी, करडी या ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. 

 

टॅग्स :Holiहोळी 2022Policeपोलिस