कामगारांना सर्वोतोपरी सहकार्य

By Admin | Updated: May 7, 2017 00:23 IST2017-05-07T00:23:22+5:302017-05-07T00:23:22+5:30

एन.डी.ए. सरकारच्या तीन वर्षाच्या काळात देशात एक लाखावर लघू उद्योग बंद पडले.

Best Supporting Workers | कामगारांना सर्वोतोपरी सहकार्य

कामगारांना सर्वोतोपरी सहकार्य

वसंतराव लाखे : मध्यवर्ती संघटनेतर्फे कर्मचारी मेळावा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : एन.डी.ए. सरकारच्या तीन वर्षाच्या काळात देशात एक लाखावर लघू उद्योग बंद पडले. मोठ्या प्रमाणात सार्वजनिक उद्योगामध्ये निर्गूतवणुक व आऊटसोर्सींग सुरू आहे. सरकारच्या खाजगीकरण धोरणामुळे कारखाण्यामध्ये टाळेबंदी होऊन हजारो कामगार बेरोजगार झाले आहे. त्यांचे जगणे दूसर होवून रोजगारअभावी कुटूंब उघड्यावर पडले आहे. अश्यावेळी असंघटीत क्षेत्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी अश्या कुटूंबातील सदस्यांना मदत करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस वसंतराव लाखे यांनी केले.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे आयोजित कर्मचारी मेळाव्यामध्ये ते बोलत होते. यावेळी संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार गोविंदराव चरडे, अध्यक्ष रामभाऊ येवले, सहचिटणीस जाधवराव साठवणे, कोषाध्यक्ष एस. बी. भोयर, पेन्शनर्स संघटनेचे पदाधिकारी सत्तारखान अब्बासखान, महिला प्रतिनिधी कल्पना पथ्थे, विरेंद्र ढबाले आदी उपस्थित होते. संघटनेमध्ये काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची कृतिशील कार्यकर्ता म्हणून निवड करण्यात आली. यात विशाल तायडे, राजेश राऊत, गजानन लोणारे, व्ही. टी. बागडे, रविंद्र मानापुरे, एम. व्ही. चावरे, आर. एस. बावनकर, एस. जी. राठोड, सी. आर. तुरकर, एस. ई. साखरवाडे, व्ही.एम. मौदेकर, व्ही. जी. चोपडे, ओ. बी. मेश्राम यांचा समावेश आहे. संचालन जाधवराव साठवणे यांनी केले. तर आभार अशोक निमकर यांनी मानले.

Web Title: Best Supporting Workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.