‘एक गाव एक गणपती’ गावाला मिळणार योजनांचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:22 IST2017-08-10T00:21:44+5:302017-08-10T00:22:19+5:30
गणेशोत्वाचा सण साजरा करतांना 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना राबविणाºया गावांना शासनाच्या सर्व वैयक्तिक व सामुहिक योजनांचा लाभ प्राधान्याने देण्यात येणार असल्याची .....

‘एक गाव एक गणपती’ गावाला मिळणार योजनांचा लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गणेशोत्वाचा सण साजरा करतांना 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना राबविणाºया गावांना शासनाच्या सर्व वैयक्तिक व सामुहिक योजनांचा लाभ प्राधान्याने देण्यात येणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिली. गणेश मंडळाला प्राप्त वर्गणी मधून शेतकºयांना मदत, जलसंवर्धन, स्वच्छता अभियान व बेटी बचाओ अभियान या सारखे सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
पोलीस बहुउद्देशिय सभागृहात आयोजित जातीय सलोखा समिती बैठकीत ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., नगराध्यक्ष सुनिल मेंढे, तुमसर नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रविशेखर धकाते, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश मेश्राम, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, अर्चना मोरे, उपअधिक्षक (गृह) एस.व्ही. कुळकर्णी व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, प्रभाकर टिकस, श्रीकांत डिसले उपस्थित होते.
शांतताप्रिय उत्सवाची जिल्ह्याची परंपरा कायम ठेवा असे आवाहन करुन जिल्हाधिकारी म्हणाले की, ईद व गणेशोत्सव एकत्र येत असल्याने उत्सवाला गालबोट लागेल असे काही घडू देवू नका. उत्सवादरम्यान सलोख्याचा उत्सव आपण सर्व साजरा करु या. महिलांची सुरक्षितता, मुतीर्ची सुरक्षितता तसेच कायदा व सुव्यवस्था या बाबतीत तडजोड केली जाणार नाही. जे सांगून एकतील त्यांना प्रशासन समजावून सांगेल, जे ऐकणार नाहीत त्यांना कायदेशिर कार्यवाहीला समोरे जावे लागेल, असे ते म्हणाले.
गणेश मंडळाकडून चांगल्या व विधायक कायार्चीच अपेक्षा आहे. ध्वनी प्रदुषण होणार नाही याची काळजी गणेश मंडळाने घेणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मुर्ती न बसविता शक्कतो शाळूच्या मातीच्या मुर्ती बसविण्यात याव्यात. एक गाव एक गणपती, एक वार्ड एक गणपती या साठी शांतता समितीच्या सदस्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. एक गाव एक गणपती राबविणाºया गावात शासनाच्या सर्व योजना प्राधान्याने राबविण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. मयार्देबाहेर होणाºया आवाजामुळे कर्णबधिरता व कानाचे आजार मोठया प्रमाणात होतात. ही बाब गणेश मंडळाने प्रकषार्ने टाळावी व हा गणेशोत्सव डिजे मुक्त गणेशोत्सव म्हणून साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले. गणेशोत्सव व ईद एकत्र येत असल्यामुळे जातीय सलोखा आबाधित असल्याचे दाखवून देण्याची ही संधी असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू यांनी सांगितले. गणेशोत्सव व इद दरम्यान दोन्ही समाजात ताण तणाव वाढणार नाही याची खबरदारी सर्वांनी घ्यावी, असे त्या म्हणाल्या. यावर्षी शासनाने उत्कृष्ट गणेश मंडळासाठी पुरस्कार जाहिर केले आहे असे सांगून साहू म्हणाल्या की, गणेश मंडळांनी धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे. जे मंडळ बॅनर, पोस्टर्स छापतील त्यावर प्रिंटरचे नाव असणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळा महाविद्यालय, रुग्णालय अशा ठिकाणी आवाजाची मयार्दा पाळण्यात यावी. शक्यतो डि.जे. मुक्त उत्सव साजरा करावा. या उत्सवादरम्यान मुलांच्या परीक्षा येत असून त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. आवाजाचा थेट परिणाम कर्ण बधिरतेवर होत असून ज्येष्ठ नागरिकांना व विद्यार्थ्यांना त्याचा खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ध्वनी विरहित उत्सव ही संकल्पना अमलात आणण्याचे आवाहन त्यांनी केले. सोशल मिडियाचा वापर समाजात तेढ निर्माण करण्यासाठी होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नगराध्यक्ष सुनिल मेंढे म्हणाले की, लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेला गणेश उत्सव साजरा होणे आवश्यक आहे. उत्सवादरम्यान कोणालाही त्रास होणार नाही. जबाबदारी आपली असून जातीय सलोखा अबाधित राहिल असा उत्सव साजरा करण्यात यावा. यावेळी विविध तालुक्यातील सदस्यांनी आपले मत व्यक्त केले. यावषीर्चा गणेशोत्सव व ईद सामाजिक एकोपा व ऐक्याचे प्रतिक राहील.