उपसरपंचांच्या मुलाला रमाई आवास योजनेचा लाभ?
By Admin | Updated: August 19, 2015 01:06 IST2015-08-19T01:06:16+5:302015-08-19T01:06:16+5:30
तालुक्यातील महालगाव (सुकळी) येथील उपसरपंच घनश्याम वालोदे यांनी पदाचा दुरुपयोग करीत सरपंच व सचिव याचेंशी संगनमत करुन आपल्या अविवाहित मुलाला रमाई आवास योजनेचा लाभ दिला..

उपसरपंचांच्या मुलाला रमाई आवास योजनेचा लाभ?
साकोली : तालुक्यातील महालगाव (सुकळी) येथील उपसरपंच घनश्याम वालोदे यांनी पदाचा दुरुपयोग करीत सरपंच व सचिव याचेंशी संगनमत करुन आपल्या अविवाहित मुलाला रमाई आवास योजनेचा लाभ दिला व पदाचा दुरुपयोग केला. या प्रकरणाची चौकशी करुन सरपंच, उपसरपंच व सचिव या तिघांवरही कार्यवाही करण्यात यावी अशी तक्रार उमाजी गजभिये रा. महालगाव यांनी खंडविकास अधिकारी यांचेमार्फत मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिली आहे. तक्रारीप्रमाणे महालगाव व ग्रामपचांयत येथे १ मे २०१३ ला ग्रामसभा घेण्यात आली. यात ठराव क्रमांक २ मध्ये रमाई घरकुल आवास योजनेचा इंदिरा आवास योजनांतर्गत वाल्मीक घनश्याम वालोदे हे अविवाहित असुन त्यांच वेगळा बीपीएल क्रमांक नसतांना प्रतिक्षा यादीत लाभार्थ्यांच्या नावासमोर जो क्रमांक लिहीला आहे त्या क्रमांकाला यापूर्वीच लाभ मिळाला आहे. वाल्मीक यांचे वडील घनशाम वालोदे हे महालगाव येथे उपसरपंच आहेत. उपसरपंच वालोदे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला आहे. याची चौकशी करण्याची मागणीही गजभिये यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)