२,१०३ रुग्णांना मिळाला आपातकालीन सेवेचा लाभ
By Admin | Updated: November 22, 2014 22:56 IST2014-11-22T22:56:05+5:302014-11-22T22:56:05+5:30
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी १०८ टोल फ्री क्रमांकाच्या सुसज्ज रुग्णवाहिका दिलेल्या आहेत. भंडारा जिल्ह्यात ६ मे २०१४ रोजी सुरु झालेल्या या सेवेचा

२,१०३ रुग्णांना मिळाला आपातकालीन सेवेचा लाभ
भंडारा : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी १०८ टोल फ्री क्रमांकाच्या सुसज्ज रुग्णवाहिका दिलेल्या आहेत. भंडारा जिल्ह्यात ६ मे २०१४ रोजी सुरु झालेल्या या सेवेचा २,१०३ रुग्णांनी लाभ घेतला आहे.
तत्कालीन आघाडी शासनाने रूग्णांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात पोहोचविण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत सुसज्ज रुग्णवहिका दिलेल्या आहेत. भंडारा येथील रुग्णवाहिकेचा १९८ रुग्णांना लाभ मिळाला आहे. शहापूर रुग्णवाहिकेचा १६८ रुग्णांना, पवनी रुग्णवाहिकेचा १७७ रुग्णांना, साकोली रुग्णवाहिकेचा ३९० रुग्णांना, पालांदूर रुग्णवाहिकेचा १५५ रुग्णांना, लाखांदूर रुग्णवाहिकेचा १८० रुग्णांना, तुमसर रुग्णवाहिकेचा २७३ रुग्णांना, सिहोरा रुग्णवाहिकेचा ३४९ रुग्णांना, लेडेंझरी रुग्णवाहिकेचा ९९ रुग्णांना तर मोहाडी येथील रुग्णवाहिकेचा ११४ रुग्णांना लाभ मिळाला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)