लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:08 IST2017-11-28T00:08:11+5:302017-11-28T00:08:56+5:30
करडी येथील नागरिक कित्येक दिवसांपासून इंदिरा आवास योजना (प्रधानमंत्री आवास योजने) अंतर्गत मिळणाऱ्यां घरकुलाच्या प्रतिक्षेत आहेत.

लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत
युवराज गोमासे ।
आॅनलाईन लोकमत
करडी (पालोरा) : करडी येथील नागरिक कित्येक दिवसांपासून इंदिरा आवास योजना (प्रधानमंत्री आवास योजने)े अंतर्गत मिळणाऱ्या घरकुलाच्या प्रतिक्षेत आहेत. त्या सर्वांची घरे कोसळली आहेत. ताडपत्रीच्या खाली परिवाराचा प्रपंच चालवत आहेत. स्वत:चा घरही बांधू शकत नाही. ही वास्तवस्थिती आहे. दारिद्रयात जगणाºया कचरा गाढवे, सुमन डोहळे, तुकाराम ठाकरे, सोनू ठाकरे व पंढरी सोनवाने यांची परंतू ना लोकप्रतिनिधींना ना शासन प्रशासनाला यांच्याकडे लक्ष पुरवायला वेळ आहे. ग्रामपचांयतसह उपरोक्त सर्वांच्या निष्क्रीय व उदासिन धोरणाचे बळी करडी येथील सदर नागरिक ठरले आहेत.
कित्येक वर्षांपासून ते घरकुलाची मागणी करीत आहेत. तरीही घरकुलाचा लाभ त्यांना मिळालेला नाही. ग्राम पंचायत पदाधिकारी व वरिष्ठ लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाचे बळी ठरले आहेत. कचरा हरीराम गाढवे हिने कित्येक वेळा ग्रामसभेत घरकुलासंबंधी विषय मांडला. पंरतू तीच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. श्रीमंताना व गरज नसलेल्यांना घरकुलाचा लाभ मिळत असताना यांच्या गरीबीकडे डोळेझाक केली जात आहे. ह्या महिलेचा घर पाडला असून छताच्या खाली जीवन जगत आहे. अश्या परिस्थितीही तीन मुलींचा लग्न केलेला आहे. एका मुलीचे लग्न शिल्लक आहे. घरची परिस्थितीची मात्र नाजूक आहे. सोनु मंगरु ठाकरे या महिलेचा संपुर्ण घर पडला असून ती घर बांधू शकत नाही. तिची परिस्थिती बिकट आहे. पंढरी साठवणे याच्याही दारिद्रयाला पारावार नाही. अत्यंत दयनिय जीवन जगत आहे. ते सुध्दा बेघर असून घर बांधू शकत नाही. कुटुंबात कमावती व्यक्ती एकटीच आहे.
या सर्व गरजवंतानी कित्येक वेळा घरकुल संबंधी ग्राम पंचायतच्या ग्रामसभेत विषय मांडला, घरकुलाची मागणी केली. पंरतू त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यांचे घरकुलाच्या/ प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रतिक्षे यादीत नाव सुध्दा आलेला नाही. उलट श्रीमंत लोकाचे नाव सन्मानचिन्ह करण्यात आले पण गरीबांना ढवलण्यात आले आहे. ह्यामुळे या सर्व गरीब गरजवंतानी आमरण उपोषणावर बसण्याची तयारी केली आहे. आता उपोषण करुन शासन प्रशासनाच्या व लोकप्रतिनिधीच्या धुळफेक करणाºया जाहिरातबाज धोरणाचा निषेध करीत मेलेले बरे, असा निर्धार घरकुल लाभार्थी कचरा गाढवे, सुमन ढोहळे, प्रकाश हलमारे, तुकाराम ठाकरे, सोनू ठाकरे, पंढरी साठवणे यांनी व्यक्त केलेला आहे.
‘मी लाभार्थ्या’मध्ये जीवन-मरणाचा संघर्ष
मी लाभार्थी आहे, शासनाच्या पोकळ आश्वासनाचा. श्रीमंताना घरकुलाचा लाभ मिळतांना पाहून त्यांच्या टोलेगंज इमारतीसमोर उभा राहून स्वत:ला दोष देण्याचा. स्वत:च्या पोरांना मृत्यूनंतरही थंडीत व बेघर ठेवण्याचा. स्वप्नातील घरता राहून पोराना शासन प्रशासनाच्या दातृत्वाच्या मोठमोठ्या गोष्टी सांगण्याचा. आभाळभर दारिद्रय घेवून जगण्याचा व मरण्याचा संघर्ष येथे पाहायला मिळत आहे.