लाभार्थ्यांचे पुनर्सर्वेक्षण गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2017 00:21 IST2017-03-20T00:21:53+5:302017-03-20T00:21:53+5:30
पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांची सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय सर्वेक्षण घरकुल यादी लाखनी तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींना प्राप्त झाली आहे.

लाभार्थ्यांचे पुनर्सर्वेक्षण गरजेचे
श्रीमंतांचा भरणा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, गरजू लाभार्थ्यांना ठेंगा
पालांदूर : पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांची सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय सर्वेक्षण घरकुल यादी लाखनी तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींना प्राप्त झाली आहे. यात सुमारे ८०० लाभार्थ्यांची नावे समाविष्ट करून ग्रामपंचायतींना कळविण्यात आले आहे. हा सर्वे २०११ च्या स्तरावरील आहे. यात अनेक घोळ किंवा विसंगती आढळल्याने मऱ्हेगावचे सरपंच शामा बेंदवार यांनी फेर सर्वेक्षण करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
गावात घरकुल यादीची माहिती घेताच प्रशासन व ग्रामपंचायतच्या विरोधात बोलणी सुरु झाली असून हिंसक विचार पुढे येत आहे. ग्रामपंचायतींनीसुद्धा तात्काळ सभा बोलवून विषयाला हात घालण्यात आला. यात प्रत्यक्ष उघड्यावर संसार थाटणाऱ्या गरजू कुटुंबियांना डावलण्यात येऊन श्रीमंताचा भरणा असल्याचा आरोप शामा बेंदवार यांनी गटविकास अधिकारी यांच्या आमसभेत आमदार बाळा काशीवार यांच्या निदर्शनात आणून दिली. याला अख्ख्या तालुक्यातील सरपंचानी प्रतिसाद देत २०११ च्या स्पर्धेत सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली. गोंदी (ढिवरखेडा) ग्रामपंचायतीला मागल्यावर्षीला एक तर यावर्षाला दोन घरकुल असल्याची माहिती सरपंच गजानन शिवणकर यांनी देत प्रत्येकच सर्वेची गरज असल्याचे म्हटले आहे. २०११ चे सर्वे हे चुकीच्याच पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप सुद्धा दामाजी खंडाईत यांनी केला आहे. पालांदुरात कुंभारटोला सर्वेत सुटला असून त्यांच्यावर अन्याय झाला आहे. (वार्ताहर)