तिसऱ्या लाटेची वाजली घंटा, जिल्हा प्रशासन होतेय सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:23 IST2021-07-19T04:23:15+5:302021-07-19T04:23:15+5:30
बॉक्स बेडसची उपलब्धता तिसऱ्या लाटेची तीव्रता जास्त असल्याचे सुतोवाच केंद्र शासनाने केले आहे. यामुळे कुठलीही जोखीम किंवा धोका न ...

तिसऱ्या लाटेची वाजली घंटा, जिल्हा प्रशासन होतेय सज्ज
बॉक्स
बेडसची उपलब्धता
तिसऱ्या लाटेची तीव्रता जास्त असल्याचे सुतोवाच केंद्र शासनाने केले आहे. यामुळे कुठलीही जोखीम किंवा धोका न पत्करता रुग्णांसाठी बेड उपलब्ध राहावे, याचीही काळजी घेतली जात आहे.
बॉक्स
लहान मुलांसाठी केअर सेंटर
तिसऱ्या लाटेत बालकांवर परिणाम होण्याची शक्यताही काही वैद्यकीय तज्ज्ञ व आरोग्य संस्थेने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात बालकांसाठी २० खाटांचा अतिदक्षता कक्ष उभारण्यासह विशेष वाॅर्डही स्थापित करण्यात आला आहे.
बॉक्स
ऑक्सिजन प्लांट निर्मितीवर भर
पहिल्यापेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची सुमार कमतरता भासली होती. आता तिसऱ्या लाटेत अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून जिल्हा आरोग्य प्रशासनाने ऑक्सिजन निर्मिती व पुरवठा यावर अधिक भर दिला आहे. भंडारासह, अदानी, सनफ्लॅग व अन्य ठिकाणांहून ऑक्सिजन आणण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. याशिवाय ऑक्सिजन निर्मिती प्लांटचे कामही धडाक्यात सुरू आहे.
कोट बॉक्स
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता लक्षात घेता जिल्हा आरोग्य प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. ऑक्सिजन पुरवठा, निर्मिती व अत्यंत भर देण्यात आला आहे. बालकांसाठी २० खाटांचा अतिदक्षता कक्ष व ५० खाटांचा वेगळा वाॅर्ड तयार करण्यात आला आहे.
डॉ. रियाज फारुकी, जिल्हा शल्य चिकित्सक, भंडारा.