तंमुस पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने प्रेमीयुगुल विवाहबद्ध
By Admin | Updated: May 19, 2017 00:58 IST2017-05-19T00:58:52+5:302017-05-19T00:58:52+5:30
नात्यात असणाऱ्या एक प्रेमी युगुलाची मने जुळली. स्वजातीय असले तरी मुलीच्या आई-वडीलांचा विवाहाला

तंमुस पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने प्रेमीयुगुल विवाहबद्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
शहापूर : नात्यात असणाऱ्या एक प्रेमी युगुलाची मने जुळली. स्वजातीय असले तरी मुलीच्या आई-वडीलांचा विवाहाला विरोध असल्याने मुलीने आपले वय १८ वर्षे पुर्ण होताच मुलाच्या गावी नांदोरा येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीकडे रितसर अर्ज करुन आपले लग्न लावून देण्याची विनंती केली. प.िरणामी तंटामुक्त गाव समितीच्या पुढाकाराने प्रेमीयुगुल विवाहबध्द झाले.
नांदोरा येथील रामरनि उर्फ विनोद रामदास धुर्वे यांचे कुटूंबातील नातेसंबंध आल्यानंतर टेकेपार (मानेगाव बाजार) येथील माधुरी उर्फ मयुरी लालचंद वंजारी हिचेसोबत ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. लग्नाच्या आणाभाका झाला. मात्र मुलीचे वय १८ पेक्षा कमी असल्याने त्यांना काही काळ प्रतिक्षा करावी लागली. स्वजातीय व नाल्यातील राहुन सुध्दा वधूचे आई वडिलांचा या विवाहाला विरोध होता त्यामुळे वधूने वराचे गाव गाठले. तंमुसचे अध्यक्ष लक्ष्मण पिकलमुंडे व पोलीस पाटील शालीकराम भुरे यांना आपला विवाह लावुन देण्याविषयी विनंती केली. त्यानुसार तंमुसची सभा ग्राम पंचायतच्या सभागृहात घेण्यात आली. कागदपत्राची शहानिशा करुन गावकऱ्यांच्या उपस्थितीत प्रेमीयुगलचा विवाह लावून देण्यात आला. यावेळी वराचे आई वडील उपस्थित होते. प्रेमीयुगलाच्या शुभमंगलप्रसंगी तंमुसचे अध्यक्ष लक्ष्मण पिकलमुंडे, पोलीस पाटील शालिकराम भुरे, माजी सरपंच गौरीशंकर गायधनी, ग्रामपंचायत सदस्य दिनेश भुरे, तंमुस माजी अध्यक्ष श्रीकृष्ण चोपकर, प्रविण भोंदे, सोसायटी अध्यक्ष सुरेश गायधनी, पोलीस नायक सचिन टिचकुले, निशांत वैद्य, विशाल काडगाये, अशोक तिजारे, विशाल भुरे, दिपक भुरे, मोहन मोहतुरे, रामदास धुर्वे, चंद्रकला धुर्वे आदी उपस्थित होते.