पीककर्ज परतफेडीकरिता बळीराजा सरसावला

By Admin | Updated: March 26, 2015 00:29 IST2015-03-26T00:29:53+5:302015-03-26T00:29:53+5:30

परिसरातील शेतकरी घेतलेला पिककर्ज बिनाव्याजाने परत करण्याकरीता एकच धावपळ करीत शून्य व्याजदरात सहभागी होण्याकरीता बँकेत गर्दी करीत आहे.

Beers used to repay the crop loan | पीककर्ज परतफेडीकरिता बळीराजा सरसावला

पीककर्ज परतफेडीकरिता बळीराजा सरसावला

पालांदूर : परिसरातील शेतकरी घेतलेला पिककर्ज बिनाव्याजाने परत करण्याकरीता एकच धावपळ करीत शून्य व्याजदरात सहभागी होण्याकरीता बँकेत गर्दी करीत आहे.
मागील खरीपात घेतलेला पिककर्ज ३१ मार्चपर्यंत परत केल्यास बिनाव्याजाने केवळ मुद्दल रक्कम भरायची असते. ही सुविधा शेतकऱ्यांना अत्यंत मोलाची व कमी त्रासाची असल्याने शेतकऱ्यांची व्याजात मोठी बचत होत आहे. पिककर्जाची जुळवाजुळव करताना अनेक समस्या शेतकऱ्यासमोर उभ्या आहेत. धानाचा भाव नसल्याने उच्चप्रतीचे धानाचे भाव आहेत. तांदळालाही भाव नसल्याने बाजारात दलालाकडे माल पडून आहे. मात्र रब्बीत मुंग, उळीद, चना, लाखोरी यांना भाव आल्याने हिम्मत बांधित पिक कर्जाच्या रक्कमेची जुळवाजुळव सुरू आहे. प्रसंगी दागीने गहाण टाकून पिककर्जाची रकमेकरिता सारासारव सुरू आहे.
एप्रिलपासून मिळणारे पिककर्ज शेतकऱ्यांचे एटीएम कार्ड ठरले आहे. सातबाऱ्यावर हक्काने कर्ज मिळत असल्याने शेती खर्चाची चिंता मिटली आहे. ही सुविधा अबाधित ठेवण्याकरीता ३१ मार्चपर्यंत कर्ज परत करणे आवश्यक आहे. पालांदूर शाखेत दररोज सुमारे २० लक्ष रूपये पिककर्ज रूपाने जमा होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Beers used to repay the crop loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.