मधमाशी पालनाचे घेतले धडे
By Admin | Updated: May 17, 2015 01:14 IST2015-05-17T01:14:41+5:302015-05-17T01:14:41+5:30
स्थानिक जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत मधमाशी पालन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

मधमाशी पालनाचे घेतले धडे
विरली (बु.) : स्थानिक जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत मधमाशी पालन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत बी. द. चेंज मुंबईचे मधमाशीमित्र श्रीकांत गजभिये यांनी पिकांच्या भरघोष उत्पादनासाठी मधमाशीचे महत्व समजावून सांगितले आणि उपस्थित शेतकऱ्यांना मधमाशी पालनाचे धडे दिले.
बी.द.चेज मुंबई शिवाजी विज्ञान महाविद्यालय पवनी आणि ग्रामायण प्रतिष्ठान विरली बु. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन पूर्ती उद्योग समूहाचे संचालक अनिल मेंढे यांचे हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी मधमाशीमित्र श्रीकांत गजभिये तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपसरपंच राजेश महावाडे, खादी ग्रामोद्योग भंडाराचे कुंभारे, शिवाजी विज्ञान महाविद्यालय पवनीचे प्रा. बी. एस. रहेले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी गजभीये यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मधमाशी हाताळण्याचे प्रशिक्षण दिले. याप्रसंगी अनिल मेंढे यांनी मधमाशीपालन हा शेतीला पुरक व्यवसाय असून खचलेल्या धान उत्पादकांना या व्यवसायातून नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. या कार्यशाळेत परिसरातील ४२ शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी तीन शेतकऱ्यांना बी. व्हेल आणि मधमाशी पालनपेटीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. रहेले, प्रास्ताविक ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष उध्दव कोरे तर आभार प्रदर्शन नानाजी कठाणे यांनी केले. कार्यशाळेसाठी ग्रामायण प्रतिष्ठानाचे बळीराम पवनकर, अखिल कोरे, मनोज बेदरे, नितेश खानोरकर, सुनिल महावाडे, प्रकाश सुखदेवे, अतुल भेंडारकर आदीनी सहकार्य केले. (वार्ताहर)