भविष्याचे बलशाली नागरिक बना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 22:03 IST2019-01-09T22:02:34+5:302019-01-09T22:03:06+5:30
हरण्याचे दु:ख बाळगू नका, चांगल्या सवयी ठेवा, मोठ्यांचा आदर करा, प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा, कारण बालवयात ज्या सवयी अंगवळणी पडतात त्याच सवयी मोठेपणी काम पडतात. प्रत्येक गोष्टीतून प्रेरणा घेत तुमचा व्यक्तीमत्व मोठ करून भविष्याचे बलशाली नागरिक बना, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले.

भविष्याचे बलशाली नागरिक बना
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : हरण्याचे दु:ख बाळगू नका, चांगल्या सवयी ठेवा, मोठ्यांचा आदर करा, प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा, कारण बालवयात ज्या सवयी अंगवळणी पडतात त्याच सवयी मोठेपणी काम पडतात. प्रत्येक गोष्टीतून प्रेरणा घेत तुमचा व्यक्तीमत्व मोठ करून भविष्याचे बलशाली नागरिक बना, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले.
शिवाजी क्रीडा संकुल भंडारा येथे आयोजित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित चाचा नेहरू बाल महोत्सवच्या समारोपीय प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती रेखा ठाकरे, विनोद डाबेराव, मनिषा कुरसुंगे, ऐश्वर्या भोयर, अरुण बांदुरकर, निपसे, ज्योती नाकतोडे, विशाखा गुप्ते, सानिका वडनेरकर, रविंद्र डोंगरे, विजय रोकडे, वैशाली सतदेवे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी महिला व बाल कल्याण सभापती रेखा ठाकरे यांनी चांगल्या वर्तनातून चांगले व्यक्तीमत्व घडवा, असे आवाहन केले. मनिषा कुरसुंगे यांनी आजपासूनच स्पर्धा परीक्षा व चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा मानस ठेवण्याचे आवाहन केले.
यावेळी बाल महोत्सवमध्ये विविध क्रिडा स्पर्धामध्ये प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्र व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. संचालन संरक्षण अधिकारी कमलेश जिभकाटे यांनी केले. आभार संरक्षण अधिकारी जिल्हा संरक्षण अधिकारी सुनिल माहुरे यांनी मानले.
महोत्सवाकरिता ऐश्वर्या भोयर, अरुण बांदुरकर, नितीन साठवणे, सुवर्णा धानकुटे, दिवाकर महाकाळकर, दिलीप रंगारी, चुन्नीलाल लोथे, विलास भेंडारकर, प्रमोद गिºहेपुंजे, अमित गजभिये, अजित नागोसे, सरीता रहांगडाले, शिल्पा रंगारी, नामदेव भुरे, योगेश बारस्कर, विनोद भुते, निलय बेंदवार आदींनी परिश्रम घेतले.