वाहनाच्या धडकेत अस्वल ठार
By Admin | Updated: March 20, 2015 00:37 IST2015-03-20T00:37:39+5:302015-03-20T00:37:39+5:30
उन्हाळ्याची चाहुल लागताच जंगलातील तलाव आटतात. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेतात. असाच प्रकार आज उघडकीस आला.

वाहनाच्या धडकेत अस्वल ठार
साकोली : उन्हाळ्याची चाहुल लागताच जंगलातील तलाव आटतात. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेतात. असाच प्रकार आज उघडकीस आला. नर व मादी अस्वल पाण्याच्या शोधात भटकत रस्त्यावर आले. यात रस्ता ओलांडीत असताना एका अज्ञात वाहनाने नर अस्वलाला जोरदार धडक दिली. यात हे अस्वल जागीच ठार झाले. ही घटना उकारा फाट्यानजीक राष्ट्रीय महामार्गावर आज (गुरुवारी) पहाटेच्या सुमारास घडली.
विर्शी फाटा ते चारगांव फाट्यापर्यंत दोन्ही बाजुला जंगल आहे. या जंगलात वन्यप्राण्यांची संख्याही मोठया प्रमाणात आहे. मात्र वनविभागातर्फे उन्हाळ्यात या जंगलात पानवठ्याची सोय करण्यात येत नाही. तलावातील पाणी आस्वलाने या जंगलातील वन्यप्राणी चारगाव गावाशेजारी असलेल्या तलावात पाणी पिण्यासाठी जातात. आज पहाटे एक नर व मादी अस्वल दोन्ही पाण्याच्या शोधात निघाले असताना रस्ता ओलांडित असताना एका अज्ञात वाहनाने नर अस्वलाला जोरदार धडक दिली. यात हे अस्वल जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्राधिकारी येसनसुरे, सहाय्यक वनक्षेत्राधिकारी नारनवरे बिटरक्षक डेवीड मेश्राम, एफडीसीएमचे विभागीय वनव्यवस्थापक इंगोले, वनक्षेत्राधिकारी शहारे, सहाय्यक वनक्षेत्राधिकारी ढोले घटनास्थळी पोहचले. मृत अस्वलाचे शवविच्छेदन डॉ. खोडसकर यानी केले. शवविच्छेदनानंतर या अस्वलाला त्याच ठिकाणी जाळण्यात आले. हे अस्वल दहा ते बारा वर्षाचे असून या अस्वलाचे वजन दिडशे किलो होते ज्या ठिकाणी ही घटना घडली याच ठिकाणी यापुर्वी एका बीबट्यासह अनेक वन्यप्राणी अपघात ठार झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)