समाजबांधवांनी एकजूट व्हावे

By Admin | Updated: August 31, 2014 23:36 IST2014-08-31T23:36:17+5:302014-08-31T23:36:17+5:30

प्रत्येकाने समाजाचे हित जोपासायला हवे. समाजाच्या उत्थाणासाठी संघर्ष करण्याची गरज पडल्यास सर्वांची गरज असते. त्यामुळे जाती - पोटजातीचा भेदभाव न ठेवता माळी समाजबांधवांनी एकजूट व्हावे,

To be united by the socialists | समाजबांधवांनी एकजूट व्हावे

समाजबांधवांनी एकजूट व्हावे

राजेंद्र महाडोळे यांचे आवाहन : लाखनीत प्रशिक्षण शिबिर व गुणवंतांचा सत्कार
लाखनी : प्रत्येकाने समाजाचे हित जोपासायला हवे. समाजाच्या उत्थाणासाठी संघर्ष करण्याची गरज पडल्यास सर्वांची गरज असते. त्यामुळे जाती - पोटजातीचा भेदभाव न ठेवता माळी समाजबांधवांनी एकजूट व्हावे, असे आवाहन विदर्भ संघटन समिती अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे यांनी केले.
अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने आज लाखनी येथील स्वप्नदीप सांस्कृतीक सभागृहात माळी समाज बांधवांचे प्रशिक्षण शिबिर, गुणवंतांचा सत्कार व नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाडोळे बोलत होते. पुढे बोलतांना त्यांनी, समाजबांधव व्यावसायीक असल्याने त्यांनी कर्तव्य म्हणून समाजासाठी काही वेळ द्यावा. यासोबतच आर्थिक अडचण नेहमी असते त्यातही प्रत्येकाने हातभार लावाला पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाला विदर्भ संघटक सुभाष सातव, साहित्यीक मनोज अंबाडकर, वर्धा जिल्हाध्यक्ष पवन तिजारे, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती रेखा भुसारी, भंडारा नगराध्यक्ष बाबुराव बागडे, उपशिक्षणाधिकारी मनोहर बारसकर, तालुका कृषी अधिकारी मोहाडी किशोर पात्रिकर, डॉ. संजया मानकर, जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीकांत भुसारी आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांची समायोचित भाषणे झाली.
यावेळी सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी समाजबांधवांना मान्यवरांनी प्रशिक्षण दिले. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्रीकांत भुसारी, संचालन भागवत मदनकर तर आभार किशोर मांदाळे यांनी केले. कार्यक्रमाला प्रकाश अटाळकर, विजय शहारे, रविकिरण भुसारी, सुनील उपरिकर, नामदेव कांबळे, खुशराम किरणापुरे, माधुरी देशकर, जयश्री सातोकर, अ‍ॅड. रविभुषण भुसारी, अरविंद बनकर, अनिल किरणापुरे, प्रा. आनंद मदनकर, बंडू बनकर, ऐकराम बोरकर, रमेश गोटेफोडे, नितीन उपरिकर, वर्षा इरले, गोपिका राऊत, रेखा नगरधने आदींसह बहुसंख्य माळी समाजबांधव उपस्थित होते.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: To be united by the socialists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.