समाजाच्या एकतेसाठी सज्ज राहा

By Admin | Updated: August 11, 2014 23:45 IST2014-08-11T23:45:36+5:302014-08-11T23:45:36+5:30

धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ठ करण्याची मागणी सुरू आहे. त्यामुळे मुळनिवासी समाजाने धनगर समाजाच्या या षडयंत्रविरूद्ध त्यांना प्रतिकार करण्यासाठी आदिवासी समाज बांधवांनी

Be prepared for the unity of the community | समाजाच्या एकतेसाठी सज्ज राहा

समाजाच्या एकतेसाठी सज्ज राहा

भंडारा : धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ठ करण्याची मागणी सुरू आहे. त्यामुळे मुळनिवासी समाजाने धनगर समाजाच्या या षडयंत्रविरूद्ध त्यांना प्रतिकार करण्यासाठी आदिवासी समाज बांधवांनी सज्ज राहून समाजाच्या एकजुटतेसाठी सज्ज राहा, असे आवाहन प्रादेशिक समाज कल्याण आयुक्त आर.डी. आत्राम यांनी केले आहे.
येथील जिल्हा परिषद सभागृहात जागतिक (आदिवासी) दिवस साजरा करण्यात आला. यावेळी आत्राम उपस्थितांना मार्गदर्शन करताना वरिल उद्गार काढले. यासोबतच समाज जागृती व उत्थानासाठी वेळ, पैसा, श्रम आणि बुद्धीचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.राजकुमार हिवारे होते. प्रमुख अतिथी म्हणून समाजकल्याण आयुक्त आर.डी. आत्राम, प्रा.वामन शेळमाके, माजी नगराध्यक्षा वर्षा धुर्वे, डॉ.किशोर कुंभरे, महिला व बालकल्याण सभापती जिल्हा क्रिडा अधिकारी ए.बी. मरस्कोल्हे, जि.प. सदस्य राजू सय्याम, अशोक उईके, ऋषी युवनाते, गणपत मडावी, ज्ञानेश्वर मडावी, गौरीशंकर सलामे, विष्णू मडावी, प्रभा पेंदाम आदी उपस्थित होते.
यावेळी प्रा.हिवारे म्हणाले, धनगर ही जात असून जमात नाही. त्यामुळे संवैधानिक तरतुदीनुसार ही जात अनुसुचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करता येत नसल्याचे सांगितले.
यावेळी आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. माध्यमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अशोक उईके, पुनम मरस्हकोल्हे, अश्विनी कोसरे, उच्च माध्यमिक परीक्षेतील वसुंधरा येरकडे, ज्योती पुसाम, गुरूदेव मडावी तर पदवी परीक्षेतील युनित धुर्वे, रवीन्द्र मडावी यांच्यासह गणपत मडावी, अजाबराव सहाये, मुरलीधर धुर्वे, जगन्नाथ वाढीवे आदींचा सत्कार करण्यात आला.
सभेत जागेश बांगर, ए.बी. मरस्कोल्हे, रेखा भुसारी, राजु सय्याम, वामन शेळमाके, डॉ.किशोर कुंभरे, प्रा.विजया पाटील, अर्जुन मरस्कोल्हे, गोवर्धन कुंभरे, प्रभा पेंदाम, ज्ञानेश्वर मडावी आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला नागेश कळपते, नरेश मडावी, कामेश कल्लो, संदीप उईके, राहुल पेंदाम, बालेश वरकडे, मनोज वरकडे, सुमित वरकडे, राकेश प्रत्येके, दिनेश ईस्कापे, करूणा इळपाते, जयश्री जगनाके, करूणा उईके, रवि मडावी, राम आहाके, रवि पंधरे आदींची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Be prepared for the unity of the community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.