सामान्यांची कामे प्रामाणिकपणे व्हावीत
By Admin | Updated: May 21, 2015 00:42 IST2015-05-21T00:42:59+5:302015-05-21T00:42:59+5:30
जनसामान्यांची कामे प्रामाणिकपणे आणि संवेदनशीलपणे व्हावीत. जिल्हाधिकारी म्हणून काम करताना सांघिक जबाबदारी ....

सामान्यांची कामे प्रामाणिकपणे व्हावीत
माधवी खोडे यांना निरोप : नवे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचे प्रतिपादन
भंडारा : जनसामान्यांची कामे प्रामाणिकपणे आणि संवेदनशीलपणे व्हावीत. जिल्हाधिकारी म्हणून काम करताना सांघिक जबाबदारी महत्वाची आहे. शासनाची जी प्राथमिकता असेल तीच जिल्हाधिकारी म्हणून माझी प्राथमिकता राहील, अशी ग्वाही जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांच्या निरोप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी, अप्पर जिल्हाधिकारी सुनिल पडोळे, उपजिल्हाधिकारी विजया बनकर, सुजाता दंदे उपस्थित होते.
यावेळी महसूल विभागाच्या वतीने डॉ.माधवी खोडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.खोडे म्हणाल्या, अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे महसूल विभागाची ९८ टक्के वसुली झाली. याचे श्रेय महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जात असल्याचे सांगितले.
यावेळी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, तहसीलदार विजय पवार, कल्याणकुमार डहाट, नायब तहसीलदार थोरवे यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालन मोहाडीचे तहसीलदार पोहनकर यांनी तर आभारप्रदर्शन जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड यांनी केले. (प्रतिनिधी)