क्रीडा क्षेत्रात पवनीचा नावलौकिक व्हावा
By Admin | Updated: February 26, 2017 00:31 IST2017-02-26T00:31:25+5:302017-02-26T00:31:25+5:30
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पवनी नगराला पर्यटन स्थळ म्हणून ओळख आहे.

क्रीडा क्षेत्रात पवनीचा नावलौकिक व्हावा
रामचंद्र अवसरे : कॅरम स्पर्धेचा उद्घाटन सोहळा
पवनी : ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पवनी नगराला पर्यटन स्थळ म्हणून ओळख आहे. क्रीडा क्षेत्र वंचित राहू नये भारतीय क्रीडा केंद्राने पुढाकार घेऊन क्रीडा क्षेत्रात पवनी नगराचा नावलौकीक व्हावा, अशी इच्छा आहे. त्यासाठी सर्वस्तरावर सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन अॅड.आमदार रामचंद्र अवसरे यांनी केले.
भारतीय क्रीडा केंद्र व प्रगती नागरी सहकारी पतसंस्था यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित ओपन कॅरम स्पर्धेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. संत गाडगेबाबा यांची जयंती असल्याने त्यांचे प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलीत करून स्पर्धेचे उद्घाटन आमदार अवसरे यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी नगराध्यक्ष पूनम काटेखाये, कॅरप पटू शेख इब्राहीम, राज्य दुग्ध महासंघाचे संचालक विलास काटेखाये, जिल्हा मत्स्य सहकारी संघाचे अध्यक्ष प्रकाश पचारे, मोहन पंचभाई, मनोहर उरकुडकर, शंकरराव मुनरत्तीवार, डॉ.योगेश रामटेके, बांधकाम समिती सभापती पूनम हटवार, बालकल्याण समिती सभापती अनुराधा बुराडे, नगरसेवक वंदना नंदागवळी, नंदा सलामे, माया चौसरे, शहजाद बेग, ताराचनद तुळसकर, राकेश बिसने, माजी उपाध्यक्ष डॉ.विजय ठक्कर, धर्मेंद्र नंदरधने, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिकराव ब्राम्हणकर, प्रगणी पतसंस्थेचे अध्यक्ष विजय रायपुरकर, क्रीडा केंद्राचे अध्यक्ष प्रकाश जायस्वाल, माजी पं.स. सदस्य अशफाक पटेल, धनंजय जटाल, ब्रम्हदास बागडे यावेळी उपस्थित होते.
बंडूभाऊ सावरबांधे यांनी क्रीडा क्षेत्रात प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळतात, नोकरीमध्येही प्राधान्य दिल्या जाते. त्यामुळे हा क्षेत्र दुर्लक्षित राहू नये असे विचार व्यक्त केले. नगराध्यक्ष पूनम काटेखाये यांनी कॅरम स्पर्धेत महिलांना सहभागी होण्याची संधी द्यावे असे मत व्यक्त केले. यासह विलास काटेखाये, प्रकाश पचारे, मोहन पंचभाई, मनोहर उरकुडकर, शंकरराव मुनरत्तीवार, डॉ.योगेश रामटेके आदींनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक संयोजक अवनती राऊत यांनी संचालन अशोक पारधी यांनी तर आभार शंकरराव मुनरत्तीवार यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)