ओबीसींच्या हक्कासाठी जागृत व्हावे
By Admin | Updated: December 19, 2015 00:34 IST2015-12-19T00:34:53+5:302015-12-19T00:34:53+5:30
संविधानातील घटनेच्या कलम ३४० नुसार ओबींसीना लोकसंख्येच्या प्रमाणात शिक्षण व नोकरीत ५२ टक्के आरक्षण मिळायला हवे,

ओबीसींच्या हक्कासाठी जागृत व्हावे
जिल्हा अधिवेशन : संजय वाणे यांचे प्रतिपादन
साकोली : संविधानातील घटनेच्या कलम ३४० नुसार ओबींसीना लोकसंख्येच्या प्रमाणात शिक्षण व नोकरीत ५२ टक्के आरक्षण मिळायला हवे, ओबीसींना घटनेने दिलेले हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी या समाजातील बुध्दीजीवी वर्गाने जागरुक व्हावे. पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी ओबीसी सेवा संघाच्या माध्यमातून चळवळ उभी करण्याची जबाबदारी बुध्दीजीवी वर्गावर आहे. त्याशिवाय ओबीसींचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होणार नाही, असे प्रतिपादन हृदयरोग तज्ज्ञ डॉ. संजय वाणे यांनी केले.
साकोली येथे नंदलाल पाटील कापगते विद्यालय ओबीसी जनगणना परिषद व जिल्हा अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डी.ए. दळवी, डॉ. महेंद्र धावळे, भैय्याजी लांबट, गोपाल सेलोकर, निश्चय दोनोडकर, जयंत झोडे, अमित गायधनी, सावंत कटरे, आर.टी. तरोणे, प्रदीप गोमासे, डॉ. अतुल दोनोडे उपस्थित होते. यावेळी डी.ए. दळवी म्हणाले, ओबीसी समाज चाली, रुढी, पूजाअर्चनेत गुंतला आहे. समाजाला जागृत करण्याचे काम सरकारी अधिकारी, डॉक्टर, शिक्षकांना करायचे आहे. आपल्या न्याय मागण्यासाठी जागृत करण्याची गरज आहे.(तालुका प्रतिनिधी)