शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडी प्रकल्प बांधकामाची चौकशी होणार

By admin | Updated: December 20, 2014 22:32 IST

बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १०० कोटींची गरज आहे. २३ कोटी ३४ लक्ष रुपयांचा प्रकल्प १४०० कोटींवर पोहोचला आहे. प्रकल्पाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून वितरिका अखंड

अधिकारी कंत्राटदारांचे धाबे दणाणले : नऊ हजार हेक्टर शेती पाण्यापासून वंचिततुमसर : बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १०० कोटींची गरज आहे. २३ कोटी ३४ लक्ष रुपयांचा प्रकल्प १४०० कोटींवर पोहोचला आहे. प्रकल्पाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून वितरिका अखंड स्वरूपाच्या नसल्याने आठ ते नऊ हजार हेक्टर शेती पाण्यापासून वंचित आहे. येथील काम निकृष्ट दर्जाचे झाले असून त्याची चौकशी करण्याचे आदेश मिळाले आहे.बावनथडी प्रकल्प तुमसर तालुक्यातील सितेकसा येथे तयार झाला आहे. सन २०१३ मध्ये धरणात पाणी साठवणूक सुरु झाली. तालुक्यातील तीन गावे विस्थापित झाली. पुनर्वसनस्थळी मूलभूत सोयींचा अभाव आहे.शेतीचा मोबदला अल्पप्रमाणात देण्यात आला आहे. धरणाच्या कामाला प्रत्यक्षात सन १९७४-७५ मध्ये सुरुवात झाली. यावेळी प्रकल्पाची किंमत १४०० कोटी झाली आहे. किंमत का वाढली या मागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. वास्तविक अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यासाठी हा प्रकल्प नंदनवन ठरले आहे. वितरिकेचे बांधकाम तुटक तुटक करण्यात आले. कुठे शेतमालक, कुठे वनविभाग तर कुठे तांत्रिक कारणे आड आली. हा प्रकल्प सुरुवातीपासून कुणीच गंभीर घेतला नाही. निवडणुकीच्या तोंडावर या प्रकल्पाचा उदोउदो मात्र प्रत्येकांकडून केल्या जातो.लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी येथे भेट देऊन प्रकल्पाचे उद्घाटन केले होते. त्यावेळी जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे सुद्धा येथे येऊन गेले होते. धरण परिसरातील गावे व तुमसर परिसरातील अनेक गावे प्रकल्पाच्या पाण्यापासून वंचित आहेत. आंबागड (तुमसर) येथे उजव्या मुख्य कालव्यावरील वितरिकेला (मायनर) मोठे भगदाड पडले आहे. येथे धरणाच्या पाण्याचा अपव्यय होतो. बांधकामाच्या कार्यक्षमतेवरच येथे प्रश्नचिन्ह उपस्थित होतो.सिंचन विभागातील आर्थिक गैरव्यवहार सध्या राज्यभरात गाजत आहे. शासनाने बावनथडी प्रकल्पासंदर्भात मागील १५ ते २० वर्षाची संपूर्ण माहिती मागितल्याची माहिती आहे.कोट्यवधींचे कंत्राट आंध्रप्रदेश येथील कंत्राटदाराला मिळाले. काही लहान कंत्राट भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील कंत्राटदारांनी घेतले. निकृष्ट बांधकाम जेथे दिसून आले तिथे शासनाची करडी नजर आहे. विभागीय आणि गोपनीय माहिती येथे मागविण्यात आली आहे. चौकशी अहवाल तयार करण्याचे काम लवकरच होणार आहे. त्यामुळे या धरणाच्या बांधकामातील दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहेत. (तालुका प्रतिनिधी)