शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

बोरी शिवारात बावनथडीचे नहर तुंबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:00 IST

तुमसर तालुक्यातील कोष्टी, बोरी, नवरगाव आणि उमरवाडा शिवारात शेतीला बावनथडी प्रकल्पाचे पाण्याचे सिंचित करण्यात येत आहे. हा शेत शिवार टेलवरील गावांचा असल्याने नहराचे पाणी जलद गतीने शेतशिवारात पोेहचत नाही. यामुळे पाणी वितरणात शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. पाणी वितरण करणारी नहर आणि कालवे केरकचरा आणि मातीने तुंबली आहेत. पाणी वितरण काळात यामुळे नहर ओव्हरफ्लो होत आहेत.

ठळक मुद्देखोलीकरणाची मागणी : कालव्यांना जागोजागी भगदाडाने शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील बोरी गावाच्या शिवारात असणारे बावनथडी प्रकल्पाचे पाणी वितरण करणारी नहर आणि कालवे केरकचरा व मातीने तुंबले आहेत. नहराचे खोलीकरण तात्काळ करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यामुळे पाणी वितरण करताना सोयीचे ठरणार आहे.तुमसर तालुक्यातील कोष्टी, बोरी, नवरगाव आणि उमरवाडा शिवारात शेतीला बावनथडी प्रकल्पाचे पाण्याचे सिंचित करण्यात येत आहे. हा शेत शिवार टेलवरील गावांचा असल्याने नहराचे पाणी जलद गतीने शेतशिवारात पोेहचत नाही. यामुळे पाणी वितरणात शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. पाणी वितरण करणारी नहर आणि कालवे केरकचरा आणि मातीने तुंबली आहेत. पाणी वितरण काळात यामुळे नहर ओव्हरफ्लो होत आहेत.समतल भागातून पाणी वाहत असल्याने नहर फुटत आहेत. नहर आणि कालव्याची दुरावस्था झाली असल्याने नहरांना जागोजागी भगदाड पडत आहेत. यामुळे अनेक शेतकºयांना पाणी मिळत नाही. नंतर त्यांची ओरड सुरू होत असल्याने नहर आणि कालव्याचे गाळ उपसा करण्याची गरज आहे.दरम्यान सिहोरा परिसरात नहराचे खोलीकरण पाटबंधारे विभागाने केले आहे. या माध्यमातून नहराची स्वच्छता झाली असून सरसकट पाणी वाटपास मदतीचे ठरणार आहे. यात नहरातील झुडपी स्वच्छ करण्यात आली असून हाच पॅटर्न बावनथडी प्रकल्प अंतर्गत बोरी शिवारात राबविण्याची गरज आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव थांबविण्याकरिता शासन स्तरावर वारंवार उपाय योजना करण्यात येत आहेत. लॉकडाऊनने अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत आहे. यामुळे तात्काळ अनुदान निधीची अपेक्षा गैर आहे.बावनथडी प्रकल्प अंतर्गत या शहराची देखभाल आणि दुरूस्ती करण्याची मागणी बोरीचे सरपंच अविनाश उपरीकार, माजी सरपंच बंडू बनकर, भाऊराव उपरीकार, सुरेंद्र बोरकर, विनोद उपरीकर, देवदास कांबळे, सरपंच प्रभाकर गुर्वे, फत्थू पासवान, नंदू रहांगडाले, दिलीप मस्के यांनी केली आहे.बोरी शेतशिवारातील बावनथडी प्रकल्प अंतर्गत असणारी नहर आणि कालवे तुंबली असून खोलीकरण, गाळ उपसा करण्याची गरज आहे.-बंडू बनकर,माजी सरपंच, डोंगरला.

टॅग्स :Rainपाऊस