सौंदळ पुनर्वसनातील पाणी पुरवठ्याची वीज कापली
By Admin | Updated: July 25, 2016 00:37 IST2016-07-25T00:37:49+5:302016-07-25T00:37:49+5:30
इंदिरा सागर गोसे प्रकल्पाच्या पोटातील सौंदळ खापरी पूनर्वसनात विविध समस्यांचा अंबार असून येथील ग्रामस्थ गेल्या ..

सौंदळ पुनर्वसनातील पाणी पुरवठ्याची वीज कापली
प्रकल्पग्रस्त पितात गढूळ पाणी : विहिरीत जंतनाशक औषध टाकलेच नाही, ठिय्या आंदोलनाचा इशारा
प्रकाश हातेल चिचाळ
इंदिरा सागर गोसे प्रकल्पाच्या पोटातील सौंदळ खापरी पूनर्वसनात विविध समस्यांचा अंबार असून येथील ग्रामस्थ गेल्या एक महिन्यापासून बोअरवेल व विहिरीचे गढूळ पाणी पित आहेत. पाणी पुरवठा योजनेची वीज कपात केल्याने ग्रामस्थांवर असा प्रसंग ओढवला आहे.
गावाचे पूनर्वसनकरतांना भौतिक सुविधा देण्याची आश्वासने देण्यात आली होते. परंतू अद्यापही नागरी सुविधांची पुर्तता शासनाने केली नसल्याने ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार घातले. जिल्हाधिकारी गोसे पूनर्वसन अधिकाऱ्यांना नोटीस देवून समस्या मार्गी लावण्याचे आदेश दिले मात्र त्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. पूनर्वसन अधिकारी म्हणतात जिल्हा परिषदेला शिल्लक कामासाठी हस्तांतरित केले आहे. जिल्हा परिषद म्हणतो, पत्र नाही. यात मात्र प्रकल्पग्रस्त पिळल्या जात आहे.
सदर समस्या तात्काळ मार्गी लावा अन्यथा प्रकल्पग्रस्त मुलाबाळांसह भंडारा-पवनी मार्गावर ठिय्याआंदोलन करण्याचा इशारा दिला पुनर्वसन वासीयांनी दिला आहे.
खापरी, सौंदळ पुनर्वसन संदर्भात अनेकदा लोकप्रतिनिधी व शासनाला लेखी निवेदने आंदोलने करुनही शासन कानाडोळा करीत आहे. पूनर्वसनात अद्यापही १८ नागरी सुविधाचंी पुर्तता केली नाही. कुणाला आर्थिक पॅकेज मिळाला नाहीर तर, कुणाला मोबदला मिळाला नाही तर कुणाला काहीच मिळाले नाही. ज्या गावकऱ्यांचे १५ ते २० वर्षापासून गावात वास्तव्य असून अशा व्यक्तींना कोणताच मोबदला मिळाला नाही पूनर्वसनस्थळी एक महिन्यापासून विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने येथील नागरिकांना विहिरीचा व बोरवेलचा पावसाळ्याचा गढूळ पाणी पीत आहेत. ज्या पाण्यात प्रशासन ब्लीचिंग पावडरही सोडत नाही. त्यामुळे पूनर्वसनात आरोग्याला मोठी हानी होण्याची शक्यता आहे. जमीन दोस्त झालेल्या नाल्या दिसेनाशा झाल्याने पाणी सैराट मार्ग मिळेल त्या मार्गाने वाहत असतो. अरुंद नाली बांधकाम, गुरेचराई जागा, दहन भूमि उखळलेले रस्ते, विद्युत समस्या, बस थांबा अशा एक ना अनके समस्यांचा सामना प्रकल्पग्रस्तांना करावा लागत आहे. प्रकल्पबाधीत व पूनर्वसीत १८ नागरी सुविधा अपूर्ण असतांना शासनाने १०० टक्के पुनर्वसन झाल्याचे पत्रान्वये घोषणा देवून प्रकल्पग्रस्तांवर दबाव आणण्याचा डाव आहे. असा आरोप सरपंच राजहंस भुते व विज लिंबार्ते यांनी केला आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असून गावठानावर प्रशासनाचे राज्य आहे. विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने १ महिन्यापासून पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरु आहे. नाहीलाजास्तव विहिरीचे गढूळ पाणी प्याले लागत आहे. प्रशासन मात्र मृंग गिळुन गप्प बसला आहे. समस्या लोकप्रतिनिध्ीांना माहित असूनही लोकप्रतिनिधी गावांना भेट देत नाही. येत्या पंधरा दिवसात प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मार्गी न लागल्यास संपूर्ण प्रकल्पग्रस्त मुलाबाळासह भंडारा-पवनी मार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा माजी सरपंच राजहंस भुते, उपसरपंच विजय लिंबार्ते, प्रदीप गजभिये व प्रकल्प ग्रस्तांनी दिला आहे.
शासनाने दिल्या नाहित सुविधा
सौंदळ या बाधीत गावात ज्यांना भुखंड नाही मिळाले ते अजुनही ६५ कुटूंब वास्तव्य करीत आहेत. शासनाने अद्यापही त्यांना भुखंड दिले नाही. तर काहीना भुखंड दिले तर घर बांधणीचा मोबदला दिला नसल्याने गावठाणात मोडक्याच घरात जीवन जगत आहेत. तर सौंदळ गटग्रामपंचायत मधील सुरबोडी गावाचे ८५ टक्के शेती बाधीत असून या गावाचा अद्यापही विचार करण्यात आला नाही. त्यामुळे त्रस्त प्रकल्पग्रस्तांनी ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार टाकला मात्र दोन महिने लोटूनही शासन कोणत्याच प्रकारचा पवित्रा घेत नाही.
पूनर्वसन अधिकारी यांनी प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने त्रस्त प्रकल्पग्रस्तांनी निवडणूकीवर बहिष्कार टाकला. पूनर्वसनावर प्रशासनाचे राज्य आहे. मात्र पाणी पुरवठा योजनेचा विज खंडीत झाल्याने नळ योजना १ महिना पासून बंद आहे याला पूनर्वसन अधिकारी जबाबदार आहेत त्यांनी वीज बिल भरावे.
- राजहंस भुते, म्ताजी सरपंच ग्रा. पं. सौंदळ
नवीन गावठाणावर निवडणुकीचा बहिष्काराने प्रशासन बसले आहे. जो पर्यंत प्रकल्पग्रस्त ग्रामपंचायतला हस्तांतरीत होत नाही तो पर्यंत आम्हाला काहीच करता येणार नाही.
- आर. डी. तलमासरे, विस्तार अधिकारी पं.स. पवनी