उपबाजार कोंढा येथे आधारभूत खरेदी केलेले धान उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:37 IST2021-05-11T04:37:35+5:302021-05-11T04:37:35+5:30
सध्या दररोज कोंढा परिसरात दुपारी ४ वाजेनंतर पावसाचे ढग जमतात. वादळी वारे येत आहेत, अशावेळी अवकाळी पाऊस आल्यास मोठे ...

उपबाजार कोंढा येथे आधारभूत खरेदी केलेले धान उघड्यावर
सध्या दररोज कोंढा परिसरात दुपारी ४ वाजेनंतर पावसाचे ढग जमतात. वादळी वारे येत आहेत, अशावेळी अवकाळी पाऊस आल्यास मोठे नुकसान होऊ शकते. उत्पन्न बाजार समिती पवनी यांना अडयाळ परिसरातील धान खरेदी करण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार अडयाळ येथील आधारभूत केंद्रावर धान मोजणी केली; पण तेथील गोडाऊन भरल्यानंतर अडयाळ येथील केंद्र कोंढा येथे सुरू केले गेले. उपबाजार कोंढाच्या मैदानात शेतकऱ्यांचे धान मोजले. ते मोजलेले धानाची उचल अजूनपर्यंत न झाल्याने उघड्यावर ठेवले आहे. लाखो रुपयांचे शासनाचे धान अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडल्यास मोठे नुकसान होऊ शकते. रविवारी कोंढा परिसरात सायंकाळी ५ वाजता वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी आल्या. त्यामुळे धानावर झाकलेले पाली उडल्या असून, जोरदार पाऊस आल्यास धानाचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.