बारमध्ये लुटमार करणारे आरोपी ११ महिन्यानंतर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:37 IST2021-02-24T04:37:06+5:302021-02-24T04:37:06+5:30

निकेश ऊर्फ नार पितांबर अलोणे रा. कस्तुरबा वार्ड वडसा, गुरूमीतसिंग उर्फ काके बलबीरसिंग सलुजा रा. किसानरगर साहुली आणि मयूर ...

Bar robbery accused jailed after 11 months | बारमध्ये लुटमार करणारे आरोपी ११ महिन्यानंतर जेरबंद

बारमध्ये लुटमार करणारे आरोपी ११ महिन्यानंतर जेरबंद

निकेश ऊर्फ नार पितांबर अलोणे रा. कस्तुरबा वार्ड वडसा, गुरूमीतसिंग उर्फ काके बलबीरसिंग सलुजा रा. किसानरगर साहुली आणि मयूर घनश्याम वाघाडे रा. राजेंद्र वॉर्ड वडसा अशी दरोडेखोरांची नावे आहे. लाखांदूर येथील तिरूमला बिअरबारमध्ये ४ मार्च २०२० च्या रात्री तीन तरूणांनी प्रवेश केला. बारचालकास लोखंडी रॉडने मारहाण करून ५० हजार १३१ रुपये लुटून पसार झाले.

याप्रकरणी अज्ञात तरूणांविरूद्ध लाखांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान लाखांदूर पोलिसांनी तपास जारी केला. ठाणेदार मनोहर कोरेटी यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक अमरदीप खाडे, अमोल कोकाटे, पोलीस नाईक लोकेश वासनिक, संदीप बावनकुळे, संदीप रोकडे, मनिष चव्हाण, सुभाष शहारे, मिलिंद बोरकर, अविनाश खरोले यांनी वडसा गाठले. तेथे या तिघांना अटक केली. अधिक तपास ठाणेदार मनोहर कोरेटी करीत आहे.

Web Title: Bar robbery accused jailed after 11 months