अपघातात बापलेक जखमी

By Admin | Updated: September 28, 2015 00:41 IST2015-09-28T00:41:56+5:302015-09-28T00:41:56+5:30

ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीला धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार बापलेक गंभीर जखमी झाल्याची घटना

Bapelke injured in accident | अपघातात बापलेक जखमी

अपघातात बापलेक जखमी

ट्रॅक्टरची धडक : तामसवाडी मार्गावरील घटना
तुमसर : ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीला धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार बापलेक गंभीर जखमी झाल्याची घटना आज २७ सप्टेंबरला सकाळी १० वाजताच्या सुमारास डोंगरला नजीकच्या तामसवाडी मार्गावर घडली.
ताराचंद धनकर गजभिये (४८) व वैभव ताराचंद गजभिये (१७) रा. कवलेवाडा जि. बालाघाट असे जखमींचे नाव आहेत. सितेपार येथील नातेवाईकांना भेटून स्वगावी परतण्याकरिता जखमी ताराचंद व त्याचा मुलगा वैभव त्यांच्या मालकीच्या दुचाकी गाडी म.पी. २२ ई ४७३६ ने डोंगरलाकडे निघाले. दरम्यान, डोंगरला-सिहोरा मार्गावरील तामसवाडी फाट्याकडून विरुद्ध दिश्ेने येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टर एम.एच. ३६ - ६८५ चे चालक संजय सदाशिव रहांगडाले (३७) रा. डोंगरला याचे वाहनावरिल नियंत्रण सुटले.
यामुळे सामोरून येणाऱ्या दुचाकीला ट्रॅक्टरची जबर धडक बसली. यात दुचाकीस्वार दुर फेकल्या गेले तर दुचाकी टॅक्टरमध्ये सापडल्याने सुमारे १०० मीटरपर्यंत फरकट नेले. यात दुचाकीचा चंदामेंदा झाला. अपघातात दोघेही गंभीररीत्या जखमी झाले.
जखमींना उपचारार्थ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी ट्रॅक्टर चालकालाविरूध्द भादंवि कलम २८९, ३३८ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Bapelke injured in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.