शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मुद्रा योजनेत कर्ज देणे बँकांना अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 10:36 PM

प्रधानमंत्री मुद्रा योजना ही शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. तरुणांच्या हाताला उद्योग देण्यासाठी सुरु केलेल्या मुद्रा योजनेत बँकेकडे अर्ज करणाऱ्या प्रत्येक उद्योगशील तरुणाला मुद्रा योजनेत कर्ज देणे अनिवार्य आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : प्राप्त अर्जाचा तात्काळ निपटारा करा, तरुणांना जास्त कर्ज द्या, बँकांनी मुद्राचा प्रसार करावा

आॅनलाईन लोकमतभंडारा : प्रधानमंत्री मुद्रा योजना ही शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. तरुणांच्या हाताला उद्योग देण्यासाठी सुरु केलेल्या मुद्रा योजनेत बँकेकडे अर्ज करणाऱ्या प्रत्येक उद्योगशील तरुणाला मुद्रा योजनेत कर्ज देणे अनिवार्य आहे. मुद्रा योजनेत बँकांचे परफॉर्मन्स आॅडिट करण्यात येईल. मुद्रा योजनेत कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकेवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यलय येथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मुद्रा योजना जिल्हा समन्वय समितीची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. सदस्य सचिव व जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, अग्रणी बँक व्यवस्थापक आर. एस. खांडेकर व जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यावेळी उपस्थित होते. भंडारा जिल्ह्यात सन २०१६-१७ मध्ये शिशु, किशोर व तरुण मिळून ५ हजार ७२६ अर्जदारांना ३० कोटी २२ लाख ७७ हजार रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. सन २०१७-१८ डिसेंबर अखेर चार हजार ३४२ अर्जदारांना ३५ कोटी ९८ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. राज्यामध्ये भंडारा जिल्ह्याची रँकिंग ३० आहे. यावर जिल्हाधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बँकांच्या टाळाटाळ प्रवृत्तीमुळे जिल्ह्याची रँकिंग कमी आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, मुद्रा योजनेत बँकांचे परफॉर्मन्स आॅडिट करण्यात येईल. ज्या बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतील त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली जाईल.मुद्रा योजनांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. जुनेच उद्योग करणाºयांना कर्ज देण्यापेक्षा नवीन उद्योग सुरु करणाºयांना कर्ज देणे अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. मुद्रा योजनेत बँकांच्या शाखांनी जास्तीत जास्त केसेस करणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त कितीही केसेस करु शकता, असे ते म्हणाले. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बँकांनी शिशु योजनेत जास्त केसेस केल्याचे निदर्शनास आले असता तरुण व किशोर योजनेत जास्तीत जास्त कर्ज देण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुद्रा योजनेत कर्ज घेऊन उद्योग सुरु करण्याची इच्छा असणाºया युवकांना बँक मोघम उत्तर देऊन त्यांचा अर्ज रद्द करत असल्याच्या तक्रारी प्राप्त आहेत. यावर नाराजी व्यक्त करून यापुढे अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित शाखा व्यवस्थापकावर कारवाईची शिफारस करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. केवळ उद्योगच नाही तर शेती पूरक व्यवसायाला सुध्दा या योजनेत कर्ज देण्यात यावे. आरसेटी व शासनाच्या विविध प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांना मुद्रा योजनेत प्राधान्याने कर्ज देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. नॉन परफॉर्मंस शाखांचा आढावा जिल्हा समन्वयकांनी शाखा निहाय घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मुद्रा योजनेची माहिती जास्तीत जास्त लोकांना व्हावी यासाठी बँकांनी जनजागृती मोहीम, मेळावे घेणे व प्रत्येक शाखेत मुद्रा योजनेचा फलक लावणे आदी बाबी प्राधान्याने कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी दिवसे यांनी दिल्या.