नुकसान भरपाईसाठी बँक दखल घेईना अन् तहसील कार्यालय लक्ष देईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:36 IST2021-04-07T04:36:04+5:302021-04-07T04:36:04+5:30
कोट मदत यादीत नाव आहे. यासाठी गावचे कृषी सहायक, तलाठ्यांनी अनेकदा मदत केली. मात्र, बँक आणि तहसील कार्यालयातील काही ...

नुकसान भरपाईसाठी बँक दखल घेईना अन् तहसील कार्यालय लक्ष देईना
कोट
मदत यादीत नाव आहे. यासाठी गावचे कृषी सहायक, तलाठ्यांनी अनेकदा मदत केली. मात्र, बँक आणि तहसील कार्यालयातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळेच आमचे अजूनही सहा महिने गेले तरी पैसे जमा झालेले नाहीत. यात तहसीलदार साहेबांनीच स्वत: लक्ष घालून त्वरित मदत करण्याची गरज आहे.
विष्णुदास हटवार, शेतकरी चिखली तथा भाजप तालुका महामंत्री भंडारा.
सरकार अनेकदा शेतकऱ्यांना वेळेत मदत करते. मात्र, तहसीलमधील काही कर्मचारी शेतकरी विचारपूस करायला गेले तरी नीट माहिती देत नाहीत. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या कामाला पहिल्यांदा प्राधान्य दिले पाहिजे. मात्र, असे होताना दिसत नाही.
- संजय आकरे, उपसरपंच, खरबी नाका.
बाॅक्स
बँकेचे बोट तहसील प्रशासकाकडेच
खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यानंतर तलाठी, कृषी सहायकांनी वाढत्या कोरोना संसर्गात शेती पिकांचे पंचनामे केले. मात्र, त्यानंतरही तालुका स्तरावरील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या अनास्थेमुळेच मदत मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. त्यामुळे मदत कधी मिळणार याचे उत्तर देताना ग्रामीण स्तरावर काम करणाऱ्या कृषी सहायक, तलाठ्यांनाच अनेकदा रोष पत्करावा लागत आहे. त्यामुळे तालुका, जिल्हा स्तरावरील कर्मचारी, अधिकारी, बँकेचे अधिकारी का विलंब लावतात, यासाठी अशांवर थेट कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे. मात्र, असे होताना दिसत नाही. त्यामुळेच सहा महिने लोटूनही बळिराजाला मात्र मदतीसाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे.