बंदचा फज्जा
By Admin | Updated: July 23, 2014 23:27 IST2014-07-23T23:27:28+5:302014-07-23T23:27:28+5:30
ओबीसी कृती संघर्ष समितीतर्फे पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील शाळा, महाविद्यालय बंदचा भंडारा जिल्ह्यात पूर्णत: फज्जा उडाला. जिल्ह्यातील सातही तालुक्यातील जिल्हा परिषदेसह खाजगी शाळा सुरू होत्या.

बंदचा फज्जा
भंडारा : ओबीसी कृती संघर्ष समितीतर्फे पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील शाळा, महाविद्यालय बंदचा भंडारा जिल्ह्यात पूर्णत: फज्जा उडाला. जिल्ह्यातील सातही तालुक्यातील जिल्हा परिषदेसह खाजगी शाळा सुरू होत्या. महाविद्यालयही रितसर सुरू होते. ओबीसी शिष्यवृत्तीसाठी पुकारण्यात आलेल्या या बंदला जिल्ह्यातून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.
ओबीसीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, या मागणीला घेवून आजपर्यंत वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. मात्र ओबीसींच्या प्रश्नावर शासन गांभीर्याने दखल घेत नाही. विशेषत: ओबीसींच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्याच्या मुद्यावर शासन विलंबाची भूमिका घेत आहे.
ओबीसी विद्यार्थ्यांना तत्काळ शिष्यवृत्ती देण्यात यावी या मागणीला घेवून ओबीसी कृती संघर्षतर्फे आज बुधवारी महाराष्ट्रातील शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्याचे कळविण्यात आले होते. त्याअंतर्गत भंडारा जिल्ह्यातही ओबीसी संघटनेने बंद पुकारला होता. एकाही शाळांनी बंद ठेवण्यासाठी पुढाकार घेतला नाही.
मात्र या बंदला शाळा व महाविद्यालयांनी प्रतिसाद दिला नाही. दरम्यान लाखांदूर तालुका ओबीस संघटनेच्या माध्यमातून शासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. हे निवेदन तहसीलदार विजय पवार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांच्या नावे पाठविण्यात आले आहे. यात विविध मागण्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)