बजरंग दलाची शस्त्र रॅली

By Admin | Updated: May 29, 2014 23:45 IST2014-05-29T23:45:50+5:302014-05-29T23:45:50+5:30

स्थानिक स्प्रिंग डेल शाळेत सुरु असलेल्या शौर्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप गुरुवारला पार पडला. त्या पार्श्‍वभूमीवर बजरंग दलाच्यावतीने शहरातून शस्त्र रॅली काढण्यात आली.

Bajrang Dal's Arms Rally | बजरंग दलाची शस्त्र रॅली

बजरंग दलाची शस्त्र रॅली

विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग : शौर्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप
भंडारा : स्थानिक स्प्रिंग डेल शाळेत सुरु असलेल्या शौर्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप गुरुवारला पार पडला. त्या पार्श्‍वभूमीवर बजरंग दलाच्यावतीने शहरातून शस्त्र रॅली काढण्यात आली.
सशक्त हिंदू राष्ट्राची निर्मिती हा उद्देश ठेऊन बजरंग दलाच्या विदर्भ प्रांत कमिटीच्यावतीने आठ दिवसीय शौर्य प्रशिक्षण शिबिर पार पडले. यात प्रशिक्षणार्थ्यांना उंच इमारतीवरून उतरण्याचा सराव, बोगद्यातून सरपटत जाणे, निशाणेबाजी, लोखंडी दांड्यावर कसरत, लाकडी खांबावरील संतुलन, भिंतीवरुन झेप घेणे, दांडपट्यासारखी काठी भिरकावणे, तलवारबाजी आदींचे प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय या शिबिरात बौद्धीक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
दरम्यान काल, शहरातून शस्त्र रॅली काढण्यात आली. रॅलीत श्रीरामाचा चित्ररथ त्यामागे बंदूक, तलवार, भाला घेऊन चालणारे बजरंग दलाचे कार्यकर्ते होते. हातात भगवा ध्वज घेऊन कार्यकर्ते ‘भारत माता की जय’ च्या घोषणा देत होते. शहरातील प्रमुख मार्गाने निघालेल्या या रॅलीचे मार्गात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. या रॅलीत विश्‍व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ.संजय एकापुरे, बजरंग दलाचे प्रविण उदापुरे, जिल्हा संयोजक तिलक वैद्य, महामंत्री सुभाष आजबले, पन्नालाल सार्वे, संजय पटले, चेतन भंडारी, राहुल ढोमणे, बंडू बारापात्रे, आदित्य मोटघरे, विरु बांते, हर्षल जावळकर, सोनू शहारे, स्वप्नील येवले, दिनेश कोरे, मनिंष बिघवे, बंटी बांते, विक्की सार्वे, देवेश नवखरे, कपील उजवणे, किशोर ठाकरे, चंद्रशेखर बनकर यांच्यासह कायकर्ते सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)
 

Web Title: Bajrang Dal's Arms Rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.