मोतीबिंदू शस्त्रक्रियेत भंडारा राज्यात अव्वल
By Admin | Updated: November 20, 2014 22:46 IST2014-11-20T22:46:02+5:302014-11-20T22:46:02+5:30
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातुन भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात सात महिन्यात दोन हजार सहा रूग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. उद्दीष्टपूर्तीकडे जाताना

मोतीबिंदू शस्त्रक्रियेत भंडारा राज्यात अव्वल
उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल : सात महिन्यांत दोन हजारांवर शस्त्रक्रिया
प्रशांत देसाई - भंडारा
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातुन भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात सात महिन्यात दोन हजार सहा रूग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. उद्दीष्टपूर्तीकडे जाताना भंडारा जिल्हा राज्यात प्रथम स्थानावर आहे. शासनाने दिलेले उद्दीष्ट सात महिन्यातच पूर्णत्वाकडे पोहोचला आहे.
राज्य शासनाच्यावतीने रूग्णांसाठी विविध योजना अंमलात आणल्या आहेत. रूग्णांवर मोफत औषधोपचार करण्यासाठी आरोग्य सेवा कार्यरत आहेत. राज्यातील सर्व जिल्हा सामान्य रूग्णालयांना एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या वर्षासाठी मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे उद्दीष्ट देण्यात आले होते.
त्यात भंडारा जिल्ह्याला २ हजार २५० मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दीष्ट होते. भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयाने उद्दीष्टपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरू केली.
भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालय व तुमसर उपजिल्हा रूग्णालयाच्या माध्यमातून एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यात जिल्ह्याने २ हजार ६ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली आहे. राज्यात बीड दुसऱ्या तर उस्मानाबाद जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भंडारा जिल्ह्यात दोन्ही डोळ्यांवर १ हजार १९४ व्यक्तींवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यात १ हजार १७३ महिला असून १ हजार ४१७ अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्तींचा समावेश आहे.
१३ नेत्र चिकित्सकांनी या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. यातील १ हजार १६४ मोतीबिंदू शस्त्रक्रिया सामान्य रूग्णालयातील मुख्य नेत्ररोग चिकित्सक डॉ.एल. के. फेगडकर यांनी केलेल्या आहेत.