शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

अवकाळीचा धानपिकांना फटका; बळीराजा अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 16:20 IST

Bhandara : तात्काळ नुकसानीचे पंचनामे करा, बागायतदारांचेही नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात गत २४ तासात आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा घात केला आहे. अवकाळीने धानपिकाला मोठा फटका बसला असून बागायतदारही अडचणीत आले आहेत. तात्काळ पंचनामे करुन मदतीची मागणी होत आहे.

आंधळगाव : अवकाळी पाऊस शेतकऱ्यांचा मागे पडला आहे. एक- दोन महिने जात नाही तर अवकाळी पाऊस येतो. आणि शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना उद्ध्वस्त करून जातो. आता कापणीसाठी तयार होत असलेला उन्हाळी धान अवकाळी पावसाचा तडाख्यात सापडला.

मोहाडी : तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका चांगलाच बसला आहे, रोगराई व अन्य संकटातुन जरी पिकांना वाचविता आले तरी नैसर्गिक आपदापासून शक्य होत नाही, हेच खरे आहे. मोहाडी तालुक्यात जांब, कांद्री, आंधळगाव, धोप, मलिदा, वडेगाव, धुसाळा, काटी, पांढराबॉडी, हरदोली, हिवरा वासेरा व परिसरात शेतातील उन्हाळी धानपीक उद्ध्वस्त केले. वादळ आणि गारपिटीमुळे धनाचे लोंब गळून पडले. या शेतकऱ्याने झालेल्या नुकसानीचा प्रशासनाकडे तक्रार केली तरीही पंचनामे करण्यास प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांकडून होत आहे.

पवनारा: तुमसर तालुक्यात रात्री ७:३० दरम्यान विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. यात बऱ्याच शेतकऱ्यांची शेकडो एकरांतील उन्हाळी धान पीक भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. गर्रा बघेडा, पवनारा, चिचोली, शेकडो एकरांतील उन्हाळी धान भुईसपाट बघेडा, पवनारा, चिचोली गावातील प्रकार कारली आदी गावांत मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान लागवड करण्यात आली आहे. हंगामात अवकाळी पावसाच्या कहरामुळे शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले आहेत.

अशातच मंगळवारी आलेल्या वादळी पाऊस झाल्याने उन्हाळी धान, भाजीपाला, शेतावरील झाडांचे मोठे नुकसान झाल्याने 'आले पीक गेले', अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला. कर्ज फेडायचे कसे, असा सवाल उपस्थित होत आहे. तातडीने नुकसान भरपाईची मागणी होत आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांचे धान व कडपा पाण्याखाली आल्याने धानाचे मोठे नुकसान झाले होते. विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी सव्र्व्हे केला, मात्र शेतकयांची विमा कंपनी दिशाभूल करून फसवणूक करीत आहे.- रशीद शेख, शेतकरी, पवनारा, 

चुल्हाड (सिहोरा): सिहोरा परिसरात अवकाळी पाऊस, वादळाने मंगळवारी रात्री ८ वाजतापासून भीषण स्वरूप दाखविले. सर्वाधिक फटका बपेरा जिल्हा परिषद गटातील गावांना बसला आहे. या गावातील विजेचा पुरवठा रात्रभर खंडित झाला होता. वीज वितरण कंपनीचे लाखोंचे नुकसान झाले असले तरी तो उन्ही धानाचे पीक शेतातच जमीनदोस्त झाले. बहुतांश घरांचे छत उडाल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आले आहेत. भंडारा-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर झाडे उन्मळून पडल्याने काही तास वाहतूक बंद करण्यात आली होती. अवकाळी पाऊस आणि वादळाने रात्री ८ वाजताच्या सुमारास परिसरात तांडव माजविण्यास सुरुवात केली. देवरी देव, सुकळी नकुल, गोंडीटोला, बपेरा गावांच्या शिवारात झाडे उन्मळून पडल्याने विजेच्या तारा तुटल्या आहेत. थेट तारांवर झाडे कोसळल्याने विजेचे खांब अर्ध्यामधून तुटले आहेत. यामुळे रात्री ८ वाजेपासून विजेचा पुरवठा खंडित झाला. गावकऱ्यांना अंधारात रात्र काढावी लागली. 

वीज वितरण कंपनीचे लाखोंचे नुकसान झाले आहे. रात्रीपासून वीज वितरण कंपनीची यंत्रणा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कामाला लागली आहे. गोंडीटोला गावात बहुतांश नागरिकांचे घरांचे छत उडाले आहेत. गोठ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. घरांचे छत उडाल्याने अनेक कुटुंब बेघर झाली आहेत. 

दिवसा उष्णता तर रात्रीला वादळ वाऱ्याचे संकट !

पालांदूर : अवकाळी वादळी वारा व पावसाने शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणले आहे. पालांदूर येथे मंगळवारच्या रात्रीला जोरदार वादळी वाऱ्याने विजेची तार तुटले. त्यामुळे तीन तास वीजपुरवठा खंडित झाला. मध्यरात्री दरम्यान वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वीज सुरळीत करण्याकरिता प्रयत्न केले. रात्री १ वाजता दरम्यान वीजपुरवठा सुरळीत झाला. दिवसाला उष्णतेच्या लाटेला सामोरे जाऊन रात्रीला वादळवाऱ्याला तोंड द्यावे लागत आहे. दिवसाला तापमान ४० च्या घरात पोहोचलेला आहे.

धान कापणी प्रभावित...जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात धान पीक अंतिम टप्यात पोहोचलेला आहे. काही ठिकाणी कापणी मळणीचे नियोजन सुरु असताना अवकाळीने कहर केल्यामुळे धान कापणी, मळणी प्रभावित झाली आहे. फळबागेतील आंबा पिकाचे मोठे नुकसान वादळ वाऱ्यामुळे होत आहे. काढणीला आलेला आंबा जमिनीवर पडून नेस्तनाबूत होत असल्याने फळ बागायतदार संकटात सापडले आहेत.

 

टॅग्स :Farmerशेतकरीbhandara-acभंडाराAgriculture Sectorशेती क्षेत्र