बख्तबुलंद शाहा यांचे पूर्णाकृती स्मारक उभारा
By Admin | Updated: March 3, 2016 00:47 IST2016-03-03T00:47:13+5:302016-03-03T00:47:13+5:30
भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोंडराजा बख्तबुलंद शाहा यांचा प्ूुर्णाकृती पुतळा महाराष्ट्र शासनाने उभारावे, ..

बख्तबुलंद शाहा यांचे पूर्णाकृती स्मारक उभारा
अभ्यासकांची मागणी : आदिवासी विकास राज्यमंत्री आत्राम यांना निवेदन
तुमसर : भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोंडराजा बख्तबुलंद शाहा यांचा प्ूुर्णाकृती पुतळा महाराष्ट्र शासनाने उभारावे, अशी मागणी गोंड राज्य अभ्यासक प्रा. डॉ. मुबारक कुरैशी व प्रा. डॉ. सुनिल चवळे ऐतिहासिक धरोवर शोध यात्रा अभ्यासमंडळ भंडारा, गोंदिया जिल्हा यांनी आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांना केली आहे. सदर निवेदन देताना राहूल डोंगरे यांनी राजे अम्ब्रीशराव आत्राम यांना या अभ्यासमंडळा मागील पार्श्वभुमी स्पष्ट करून सांगितले.
गोंड जमात विजनवासी जमात असून या भागात आरंभापासून आजत गाजत वसाहत करून आहे. पराक्रमी गोंड नेत्यांनी विखुरलेल्या टोळ्यांचे संघटन करून या भागात मोठी राज्ये निर्माण केलीत, आंबागड, पवनी, प्रतापगड, सानगडी ही ऐतिहासीक किल्ले त्याची साक्ष आहेत. १५ ते १८ व्या शतकाच्या कालावधीत आजचा भंडारा जिल्हा गोंड राज्य सत्तेचा अविभाज्य घटक होता. याच गोंड राजवटीत बख्तबुलंद शाहा नावाचा प्रभावी गोंड राजा होऊन गेला. एक प्रशासक म्हणून त्याने जे निर्णय घेतले त्याला गोंड राजवटीत तोड नाही. मिळालेल्या अल्पशा अवधीत त्याने भरपूर राज्य विस्तार केला. या मागासलेल्या भागाचे मुलभूत विकास करण्याचे श्रेय बख्तबुलेद शाहाला जाते. जंगलाचे रूपांतर शेतीत करून अनेक प्रशासकीय व महसूल विषयक सुधारणा अंमलात आणल्या. गावे वसवून वेगवेगळ्या प्रदेशातून कुसल कारागीर आणून कृषी, उद्योग व व्यापार यांचा पाया घातला. विशेषत्वाने भंडारा जिल्ह्याचे विकासाचे श्रेय बख्तबुलंद शाहा या गोंड वंशीय राजाला द्यावे लागते. गोंड वंशिय जमात या भागात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. ऐतिहासीक वारसा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात राजे बख्तबुलंद शाहा यांचा पुर्णाकृती पुतळा उभारून ऐतिहासीक धरोहर या भागात जिवंत ठेवता येईल. निवेदन देतेवेळी राज्यमंत्री डॉ. सुनिल चवळे, डॉ. मुबारक कुरैशी यांच्या नेतृत्वात प्राचार्य चेतन मसराम, प्रा. मोहन भोयर, गणेश बर्वे, प्रा. वरखडे, प्रा. जाधव, सीताराम जोशी, नागपूर विद्यापीठ अध्यक्ष नितेश फुलेकर, अंकीत दुबे, नायब तहसिलदार हरीशचंद्र मडावी, महेश गायधने, किशोर चौधरी संस्थापक ओम साई शिक्षण संस्था, लीलाधर वाडीभस्मे, अनिल कारेमोरे, प्रा. उबाळे, रामेश्वर धुर्वे, अशोक उईके, नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे, बिसन सयाम, मुकेश भलावी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)