बाबुजींच्या जयंतीनिमित रक्तदान शिबिर
By Admin | Updated: July 3, 2016 00:23 IST2016-07-03T00:23:33+5:302016-07-03T00:23:33+5:30
लोकमतचे संस्थापक संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त लोकमत ...

बाबुजींच्या जयंतीनिमित रक्तदान शिबिर
भंडारा : लोकमतचे संस्थापक संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त लोकमत जिल्हा कार्यालयाच्यावतीने रक्तदान शिबिर पार पडले. रक्तदान शिबिरात भंडारावासीयांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.
लोकमत व लाईफलाईन ब्लड बँक व कॉम्पोनेंट आणि अप्रायसेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने शालवन कोचिंग सेंटर येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन पहिले रक्तदान करणारे सहादेव बारस्कर, लाईफ लाईन ब्लड बँकेचे डॉ.अविनाश बाभरे, कार्यालयप्रमुख मोहन धवड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी नंदू परसावार, प्रतिनिधी इंद्रपाल कटकवार, समाचारचे शशीकुमार वर्मा, जाहिरात प्रतिनिधी विनोद भगत उपस्थित होते. यावेळी सहादेव बारस्कर, किरण वाघमारे, ज्ञानेश्वर खोब्रागडे, लोकेश खोटेले, लोकेश वासनिक, आनंद भुते, नितीन धारगावे, आलोक खराटे, पारितोष झिंझर्डे, प्रदीप घाटगे, चित्राग्नी धकाते, दिलीप लेपसे, मंगेश फाये, राजेश फटे व वैशाली नशीने यांनी रक्तदान केले. संचालन ललीत घाटबांधे यांनी तर नियोजन सीमा नंदनवार यांनी केले. कार्यक्रमात देव्यानी सेलुकर, रसिका वैद्य, श्वेता घाटोळे, अनुप मोरकर, शशांक रामप्रसाद, अंशुल शाहू, स्रेहा वरकडे, धनू खोत, हिमांशु आकोलकर यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)