बाबासाहेबांचे विचार प्रेरणादायी
By Admin | Updated: December 7, 2015 05:01 IST2015-12-07T05:01:42+5:302015-12-07T05:01:42+5:30
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार भारतासाठीच नव्हे तर सर्व विश्वासाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. त्यांच्या

बाबासाहेबांचे विचार प्रेरणादायी
भंडारा : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार भारतासाठीच नव्हे तर सर्व विश्वासाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. त्यांच्या कार्याची महती फक्त पुस्तकापुरती मर्यादित नसून प्रत्येकाने अंगीकारावी अशी आहे. बाबासाहेबांना जावून ५९ वर्ष पूर्ण झाली असली तरी त्यांच्या विचाराची जोत मानवजातीला सदैव प्रेरणादायी आहे, असा सुर जिल्हयात ठिकठिकाणी आयोजित कार्यक्रमप्रसंगी व्यक्त्यांनी व्यक्त केला.
बाबासाहेबांच्या ५९ व्या पुण्यतिथीनिमित्त जिल्ह्याभरात ठिकठिकाणी अभिवादन सभेचे व त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळा महाविद्यालय, शासकिय कार्यालयासह निमशासकीय संस्था, गावागावातील बौध्द विहार समिती, बचत गट आदींच्यावतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भंडारा शहरातून समाजबांधवाच्या वतीने सायंकाळी कॅण्डल रॅली काढण्यात आली होती. यात हजारोंच्या संख्येने समाजबांधव उपस्थित झाले होते. विशेष म्हणजे महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. ही रॅली शास्त्री चौकातून निघून त्रिमुर्ती चौकापर्यंत आली. चौकातील बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर मेणबत्तीच्या उजेडात बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. (प्रतिनिधी)
तू साहेब झालास मोठा, भीमाच्या पुण्याईने...
४रमाबाई आंबेडकर वॉर्ड येथे भीमबुध्द गीतांचा कार्यक्रम रविवारी सकाळपासूनच घेण्यात आला. जिल्हा परिषदेनजकी गणेशपूर मार्गावर आयोजित या कार्यक्रमाला हजारो नागरिकांची उपस्थिती होती. वैद्य ग्रुपच्या कलावंतानी भीमबुध्दांवर आधारित विविध गीते गावून त्यांच्या आठवणी जागवल्या. तू साहेब झालास मोठा, भीमाच्या पुण्याईने..., कायदा भीमाचा..., भीमा तुझ्या जन्मामुळे कोटी कोटी उध्दारले..., हे निळ्या पाखरा..., माझ्या भीमाच्या नावानं कुंकू लाविलं रमानं... आदी गितांवर श्रोत्यांनी भरभरुन दाद दिली व कार्यक्रमाची रंगत वाढत गेली.