कोंढा येथे बाबा जुमदेवजी यांची जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:36 IST2021-04-07T04:36:06+5:302021-04-07T04:36:06+5:30
कोंढा कोसरा : मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची १००वी जयंती कोंढा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ...

कोंढा येथे बाबा जुमदेवजी यांची जयंती
कोंढा कोसरा : मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची १००वी जयंती कोंढा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ कोंढा व राजमुद्रा ग्रुपतर्फे आयोजन करण्यात आली होती. यावेळी महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन दूर करण्यासाठी तसेच गोरगरिबांना व्यसनमुक्तीचा सल्ला देत व्यसनमुक्त समाज करण्यासाठी महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या १००व्या जन्मदिनी परमात्मा एक मंडळ कोंढा व राजमुद्रा ग्रुपतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
आनंदराव गिरडकर यांच्या हस्ते महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून विनंती करण्यात आली आणि त्यानंतर जयंतीनिमित्त १०० केक कापण्यात आले. तसेच महाप्रसाद वितरण करण्यात आले. यावेळी परमात्मा एक सेवक जयदेव गिरडकर, प्रकाश कुझेकर, शिवशंकर जांभुळकर, विलास गिरडकर, उज्ज्वल कारेमोरे, प्रकाश गिरडकर, विलास जांभुळकर, हरिहर गिरडकर, वसंता कुझेकर, शुभम मोहरकर, लोपचंद जिभकाटे, हितेश भुरे, गणेश मोहरकर, महेश जिभकाटे, अंकित कुझेकर, सोनू सेलोकर, गौरव माकडे, हिमेश कुझेकर, तुषार जिभकाटे, विलास हटवार, हुसन कारेमोरे, प्रेम जांभुळकर, सूरज जांभुळकर आणि सेविका उपस्थित होत्या. तसेच राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष नागेश जिभकाटे, पंकज वंजारी, ऋषीकुमार सुपारे, युगल सेलोकर, अंकित हटवार, अमोल जिभकाटे, निखिल रिनके, पिंटू जांभुरे ग्रुपचे सभासद उपस्थित होते.