बाबा जुमदेवजींनी माणुसकीची शिकवण दिली

By Admin | Updated: December 25, 2016 00:46 IST2016-12-25T00:46:53+5:302016-12-25T00:46:53+5:30

महान त्यागी बाबा जुमदेवजींनी स्थापन केलेल्या मानवधर्माच्या सहाय्याने त्यांनी समाजातील अंधश्रद्धा,

Baba Jumdevji taught humanity | बाबा जुमदेवजींनी माणुसकीची शिकवण दिली

बाबा जुमदेवजींनी माणुसकीची शिकवण दिली

नाना पटोले : परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचा कार्यक्रम, नाटक पुस्तिकेचे प्रकाशन
कोंढा (कोसरा) : महान त्यागी बाबा जुमदेवजींनी स्थापन केलेल्या मानवधर्माच्या सहाय्याने त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, अन्याय, अत्याचार नष्ट करण्याचे कार्य केले. मानवी जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या वाईट व्यसनांना नष्ट करून दु:खी, गोरगरीब, पीडित लोकांना त्यांच्या दु:खातून मुक्त व माणुसकीची शिकवण दिली. त्यामुळे ते एक थोर समाजसुधारक होते, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.
कोंढा येथे परमात्मा एक सेवक संमेलनात कसोटी नाटकाच्या प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते.
परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ कोंढा कोसराच्या सौजन्याने प्रा.दिपक नारायण जिभकाटे लिखीत कसोटी या नाटकाचे प्रकाशन व सेवक संमेलन आयोजित केले. या संमेलनाचे उद्घाटन खासदार नाना पटोले यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मार्गदर्शक राऊत गुरुजी, प्रमुख अतिथी म्हणून सरपंच शेवंता जुगनाईके, आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, पूर्ती समूह संचालक अनिल मेंढे, पवनी तालुका भाजपाध्यक्ष के.डी. मोटघरे, ज्येष्ठ मार्गदर्शक रामकृष्ण जांभुळकर, दामोधर जिभकाटे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख विजय काटेखाये, पंचायत समिती सदस्य कल्पना गभणे, प्रा. चरणदास बावणे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानदेव कुर्झेकर, विनोद भुरे, धनराज जिभकाटे, मुनीर शेख, प्रकाश कुर्झेकर, प्रा.दिपक जिभकाटे, धनराज गभणे, शंकर वैद्य आणि बाहेरगावचे ज्येष्ठ मार्गदर्शक उपस्थित होते.
यावेळी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ कोंढा कोसरा तर्फे खासदार नाना पटोले व आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांना निवेदन देून बाबा जुमदेवजी यांच्या चरित्रावर आधारित पाठ नवीन अभ्यासक्रमात घेण्यासंबंधी शासन दरबारी प्रयत्न करावे तसेच ३ एप्रिल हा दिवस बाबा जुमदेवजी यांचा जन्मदिवस असल्याने त्या दिवशी शासनाने सरकारी सुटी जाहीर करावी, यासंबंधात प्रयत्न करण्याची विनंती केली. खासदार नाना पटोले यांनी पुढे बोलताना, गोसे प्रकल्पाचे काम १९१९ पर्यंत पूर्ण करून त्यास केंद्र शासनाकडून निधी मिळवून पुनर्वसन व शेतकऱ्यांचे जमिनीचा वाढीव मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार व बाबा जुमदेवजी यांच्या जीवनचरित्राचा नवीन पाठ्यपुस्तकात समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार अवसरे यांचे भाषण झाले. प्रास्ताविक विनोद भुरे यांनी केले. संचालन जयदेव गिरडकर यांनी केले. तर आभार धनराज जिभकाटे यांनी मानले. कसोटी नाटकाचे प्रकाशानंतर त्या नाटकाचे सादरीकरण परमपूज्य परमात्मा एक सेवक नाट्य मंडळ कोंढा तर्फे करण्यात आले. कार्यक्रमास नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील सेवक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी दिपक जिभकाटे, चंदू कुर्झेकर, गंगाधर रेवतकर, विलास हटवार, वसंता कुर्झेकर, नामदेव मोहरकर, प्रकाश कुर्झेकर, कैलाश वंजारी, वासुदेव जिभकाटे, महेश जिभाकटे, बंडू जांभुळकर, राजू शिंगाडे, देवराम वैद्य, विनोद बिलवणे, यादोराव जांभुळकर यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: Baba Jumdevji taught humanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.