बाबा जुमदेवजींनी दिली जीवन जगण्याची प्रेरणा
By Admin | Updated: October 14, 2016 03:34 IST2016-10-14T03:34:25+5:302016-10-14T03:34:25+5:30
मानव धर्मीय प्रेणेते, सत्याचे जनक अंधश्रद्धा व वाईट व्यसन मुक्तीचे जीवन जगण्याची प्रेरणा देणारे परमपुज्य परमात्मा एक सेवक

बाबा जुमदेवजींनी दिली जीवन जगण्याची प्रेरणा
ब्रम्हानंद करंजेकर यांचे प्रतिपादन: साकोलीत बाबा जुमदेवजी पुण्यतिथी सोहळा
साकोली : मानव धर्मीय प्रेणेते, सत्याचे जनक अंधश्रद्धा व वाईट व्यसन मुक्तीचे जीवन जगण्याची प्रेरणा देणारे परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपुरचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांनी वयाच्या पंचेवीसाव्या वर्षी एका भगवंताची कृपा संपादन करून मानव धर्माची स्थापना केली व मानव धर्माच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात दौरे करून दुखी कष्टी लोकांना भगवतंत कृपेचा लाभ मिळवून दिला, असे मत जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव डॉ. ब्रम्हानंद करंजेकर यांनी मानव मंदीर साकोली येथे आयोजित बाबा जुमदेवजी यांची पुण्यतिथी व रोगनिदान शिबिराप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी मंचावर नागपुर मंडळाचे अध्यक्ष राजु मदनकर, संचालक सुरजलाल अंबुले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, साकोली मार्गदर्शक वसंतराव ठेगडी, जि.प. सदस्य होमराज कापगते, डॉ. राजेश चंदवानी, अनिल चांदेवार, देवदास वलथरे, उत्तम वाडीभस्मे, पंढरीजी वाडीभस्मे, हेमकृष्ण वाडीभस्मे, वासुदेव वाडीभस्मे उपस्थित होते.
डॉ. करंजेकर पुढे म्हणाले की, आध्यात्मीक समान कार्याशी सांगड बांधून अमुल्य कार्य महानत्यागी बाबा जुमदेवजीनी केले.
अंधश्रद्धा दूर करून वाईट व्यसनातून मुक्त जीवन जगण्याची प्रेरणा दिली. अंधश्रद्धा निर्मूलन, मर्यादित कुटूंब, व्यसन मुक्ती व मर्यादा व प्रेमाची शिकवणूक देऊन मोठे समाजकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखेचे उपाध्यक्ष अनिल चांदेवार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन नारायन येळे यांनी तर आभार प्रदर्शन जितेश वाडीभस्मे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)