भामट्याने १५ हजाराने शिक्षकाला गंडविले
By Admin | Updated: June 5, 2015 00:48 IST2015-06-05T00:48:41+5:302015-06-05T00:48:41+5:30
एका शिक्षकाला भामट्याने मी बँकेचा व्यवस्थापक आहे आपला एटीएम क्रमांक बंद झाला आहे.

भामट्याने १५ हजाराने शिक्षकाला गंडविले
तुमसरातील घटना : बँक व्यवस्थापक असल्याचे सांगून मागितला कोडनंबर
ंतुमसर : एका शिक्षकाला भामट्याने मी बँकेचा व्यवस्थापक आहे आपला एटीएम क्रमांक बंद झाला आहे. तो सुरु करण्याकरिता क्रमांक तात्काळ सांगा अशी बतावणी केली. शिक्षकाने तात्काळ एटीएम क्रमांक एसएमएस केला. भामट्याने प्रथम १० हजार व नंतर ५ हजार रुपये काढले. असा मॅसेज आल्यावर आपली फसवणूक झाल्याचे शिक्षकाला समजले. अज्ञात भामट्याविरोधात तुमसर पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली.
येरली येथील शिक्षक मनोहर कापगते यांच्या भ्रमणध्वनीवर एका अज्ञात इसमाने फोन केला. मी बँकेचा व्यवस्थापक बोलत आहे, तुमचा एटीएम कार्ड ब्लॉक झाला आहे. त्यामुळे तुम्ही आपले कोडनंबर द्या, ज्यामुळे आम्हाला तो अनलॉक करता येईल. कापगते यांनी क्षणाचा विचार न करता एटीएम कार्डचा कोडनंबर सांगितला.
भामट्याने आवाज येकू येत नाही तुम्ही मला एसएमएस करा, कापगते यांना आपली फसवणूक होत आहे याची तिळमात्र शंका आली नाही. त्यांनी एटीएम कोडनंबर एसएमएस केला.
सुमारे १५ मिनिटात कापगते यांच्या भ्रमणध्वनीवर एटीएम मधून प्रथम १० हजार व नंतर ५ हजार रुपये काढल्याचा मॅसेज आाल. आपली फसवणूक झाल्याचे कापगते यांना समजले. त्यांनी तुमसर पोलिसात अज्ञात भामट्याविरोधात तक्रार नोंदविले आहे. (तालुका प्रतिनिधी)