आयुर्वेदच्या एम.डी.एन.एस. डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे कायदेशीर अधिकार
By Admin | Updated: June 25, 2014 00:16 IST2014-06-25T00:16:21+5:302014-06-25T00:16:21+5:30
आयुर्वेद युनानी डॉक्टरांना आधुनिक चिकित्साशास्त्र अर्थात मॉडर्न मेडीसीन ही प्रचार पद्धत वापरण्याच्या परवानगीला तब्बल ४१ वर्षानंतरच्या लढाईनंतर कायद्याचे संरक्षण मिळाले. त्यामुळे यापुढे आयुर्वेद

आयुर्वेदच्या एम.डी.एन.एस. डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे कायदेशीर अधिकार
शिक्कामोर्तब : आयुर्वेद, युनानी डॉक्टरांसाठी ४१ वर्षांनी कायद्यात तरतूद
अड्याळ : आयुर्वेद युनानी डॉक्टरांना आधुनिक चिकित्साशास्त्र अर्थात मॉडर्न मेडीसीन ही प्रचार पद्धत वापरण्याच्या परवानगीला तब्बल ४१ वर्षानंतरच्या लढाईनंतर कायद्याचे संरक्षण मिळाले. त्यामुळे यापुढे आयुर्वेद युनानीच्या सर्व वैद्यक शाखेच्या डॉक्टरांना ही उपचार पद्धत वापरण्यावर आता शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
विधिमंडळात या संदर्भात सविस्तर चर्चा होऊन त्याबाबत महाराष्ट्र मेडीकल प्रॅक्टिशनर्स अॅक्ट १९६१ चया कायद्यातील कलम २५ मध्ये ४ व ५ या उपकलमांचा समावेश करण्यात आला आहे.
त्या संदर्भातील अॅक्ट मान्य करुन जाहीर करण्यात आला आहे. या तरतुदीमुळे आयुर्वेद युनानीच्या ८२ हजार डॉक्टरांना लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. आयुर्वेद युनानीच्या डॉक्टरांना मॉडर्न मेडीसीनची उपचार पद्धत वापरण्यासाठी १९७३ पासून मागणी होत होती. त्यामागणीची दखल घेऊन १९९२ साली तत्कालीन आरोग्यमंत्री पुष्पा हिरे यांनी अध्यादेश जारी करुन परवानगी दिली होती.
मात्र त्याला कायद्याचे संरक्षण लाभले नव्हते. त्यामुळे १९९९ मध्ये तत्कालीन आरोग्य मंत्री दौलतराव अहेर यांनी औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० च्या अंतर्गत दुसरा अध्यादेश जारी केला. महाराष्ट्र मेडीकल प्रॅक्टिशनर्स १९६१ च्या कायद्यात या उपचारपद्धती वापरण्याबाबतच्या परवानगीचा समावेश नसल्याने संरक्षण मिळाले नव्हते.
त्या लढाईला विधीमंडळात मान्यता मिळाली. त्यामुळे आयुर्वेद युनानीच्या डॉक्टरांना मॉडर्न मेडीसीनची प्रॅक्टीससाठी कायदेशीर संरक्षण मिळाले आहे, अशी माहिती पवनी तालुका निमा संघटनेचे सचिव डॉ. विजय करंजेकर यांनी दिली. (वार्ताहर)