रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त लाखनीत निघाली जनजागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:38 IST2021-02-05T08:38:55+5:302021-02-05T08:38:55+5:30
पोलीस निरीक्षक संजय कोरचे, जेएमसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय प्रताप सिंह, सुरक्षा अधिकारी परेश घालनकर, वाहतूक पोलीस राजेंद्र लांबट ...

रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त लाखनीत निघाली जनजागृती रॅली
पोलीस निरीक्षक संजय कोरचे, जेएमसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय प्रताप सिंह, सुरक्षा अधिकारी परेश घालनकर, वाहतूक पोलीस राजेंद्र लांबट व लोकेश ढोक, ॲड. शफी लद्धानी, ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे प्रा. अशोक गायधने, अशोक वैद्य यांनी रॅलीला संबोधित करून सर्व वाहनचालकांनी हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करावा, रस्ता सुरक्षेचे नियम पाळून अपघात टाळावेत, असे सांगितले. या वेळी जेएमसीतर्फे रस्ता सुरक्षा नियमांचे पत्रक जनतेला व दुचाकी, चार चाकी वाहन चालकांना वाटण्यात आले. विशेष म्हणजे महामार्गावर वाहतुकीचे, रस्ता सुरक्षेचे नियम पाळणारे हेल्मेटधारी, सीटबेल्टधारी वाहनचालकांना स्वतः पोलीस निरीक्षक, वाहतूक पोलीस तसेच जेएमसीचे अधिकारी, कर्मचारी यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सिंधी लाइन चौकातदेखील मार्गदर्शन करण्यात आले. संचालन परेश घालनकर, युनूस आकबानी यांनी तर प्रास्ताविक ॲड. शफी लद्धानी यांनी केले. यशस्वीतेकरिता पोलीस ठाणे, जेएमसीचे सर्व अधिकारी, कर्मचारी, ग्रीनफ्रेंड्सचे छविल रामटेके, अर्णव गायधने, दीप रामटेके, अमर रामटेके, साहिल निर्वाण, गौरेश निर्वाण, प्रज्वल भांडारकर, नेहांत निंबारते, वंजारी इत्यादींनी परिश्रम घेतले.