कुंभली यात्रेत अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन शिबिर
By Admin | Updated: January 20, 2016 00:53 IST2016-01-20T00:53:28+5:302016-01-20T00:53:28+5:30
नजीकच्या कुंभली यात्रेतील दुर्गाबाईचा डोह यात्रेच्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व राज्य सरकारी कर्मचारी संघटना ...

कुंभली यात्रेत अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन शिबिर
मार्गदर्शन : अंनिस तथा राज्य कर्मचारी संघटनेचा संयुक्त उपक्रम
साकोली : नजीकच्या कुंभली यात्रेतील दुर्गाबाईचा डोह यात्रेच्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती व राज्य सरकारी कर्मचारी संघटना शाखा साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कर्मचारी संघटना शाखा साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन व जादुटोणा विरोधी कायदा व वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर शिबिर घेण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते यांनी केले. अतिथी म्हणून अंनिसचे जिल्हा संघटक वसंत लाखे, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राम येवले, जिल्हा संघटक (गोंदिया) प्रकाश धाटे, प्रा. एस.एस. चव्हाण, मुलचंद कुकडे, उपाध्यक्ष डी.जी. रंगारी, महिला संघटिका प्रिया शहारे, झंझाड, रमेश गोटेफोडे, ए.बी. भोयर आदी उपस्थित होते.
प्रथम सत्रात जि.प. सदस्य अशोक कापगते, प्रिया शहारे, वसंत लाखे, राम येवले, मुलचंद कुकडे, डी.जी. रंगारी, डॉ. प्रकाश थोटे, एस.एस. चव्हाण यांनी जादुटोणा विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर प्रकाश टाकला. दुसऱ्या सत्रात एस.एस. चव्हाण, डॉ. प्रकाश थोटे, डी.जी. रंगारी, प्रा. प्रोफेसर बहेकार, बी.एल. मेश्राम, के.एस. रंगारी यांनी प्रयोगाच्या माध्यमातून तांत्रिक, मांत्रिक, बुवा बाबा कसे फसवणूक करतात हे वैज्ञानिक प्रयोगातून पटवून दिले. विविध प्रयोग दाखविण्यात आले. लिंबूतून रक्त काढणे, जिभेतून त्रिसुत्व काढणे, जळता कापूर खाणे, जळता टेंबा त्वचेवरून फिरविणे, काठीने पाण्याने भरलेला ग्लास उचलणे, हवेतून नोटा काढणे असे अनेक विविध प्रयोग सादर करण्यात आले.
के.एस. रंगारी, आशा वासनिक यांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर गीत सादर केले. संचालन व प्रास्ताविक तालुका संघटक बी.एल. मेश्राम यांनी केले तर आभार सचिव यशवंत उपरीकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी डी.जी. रंगारी, बी.एल. मेश्राम, प्रोफेसर बहेकार, सचिव यशवंत उपरीकर, के.एस. रंगारी, नरेश रामटेके, आशा वासनिक, भीमराव मोटघरे, राजू बन्सोड, टी.एच. उके, किशोर गडकरी आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)