भूसंपादनाचे पैसे देण्यासाठी टाळाटाळ

By Admin | Published: May 17, 2017 12:20 AM2017-05-17T00:20:27+5:302017-05-17T00:20:27+5:30

येथील महिला शेतकरी शामकला अशोक गभणे यांची शेतजमीन कुशारी येथे असून ...

Avoid making money for land acquisition | भूसंपादनाचे पैसे देण्यासाठी टाळाटाळ

भूसंपादनाचे पैसे देण्यासाठी टाळाटाळ

googlenewsNext

शेतकरी संतप्त : बावनथडी उपविभागाकडून महिला शेतकऱ्यांना त्रास
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : येथील महिला शेतकरी शामकला अशोक गभणे यांची शेतजमीन कुशारी येथे असून त्यांच्या शेतातील ०.३९ हेक्टर आर जागेतून बावनथडी प्रकल्पाचे नहर गेलेला आहे.नहरासाठी जागा संपादीत केल्याचा त्यांना नोटीस सुद्धा देण्यात आला. भूमीअभिलेख कार्यालयाकडून मोजणीसुद्धा करण्यात आली. मात्र संबंधित कार्यालयातील अभियंता आकांक्षा सिंग या संबंधित महिला शेतकऱ्याला संपादीत जमिनीचे पैसे देण्यास टाळाटाळ करीत असून मागील एस महिन्यापासून महिला शेतकऱ्याला कार्यालयाचे उंबरठे झिजवायला लावण्यात येत आहे. असा आरोप शेतकरी महिलांनी पत्रपरिषदेत केला.
शामकला अशोक गभणे यांची शेतजमिन संपादीत करण्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कलम एकचे नोटीस देण्यात आले होते. त्यानंतर उपविभागीय कार्यालय, बावनथडी उजवा कालवा उपविभाग क्रमांक ५ तुमसर पत्र क्रमांक १२५९ नुसार राघो गायधने व शामकला गभणे यांची ०.४६ हेक्टर आर जागा संपादीत करण्याचे पत्र देण्यात आले. पुन्हा पत्र क्रमांक १२५९ नुसार ०.४६ आर जागा संपादीत करण्यासाठी संमती पत्र दाखल करण्याचे तसेच प्रती हेक्टर ६ लक्ष, ३८ हजार ६०१ प्रमाणे ०.४६ हेक्टर आर जागेचे १४ लक्ष ६८ हजार ७८२ रुपये किंमत सुद्धा काढण्यात आली. त्यामुळे शामकला गभणे या संमतीपत्र लिहून देण्यासाठी गेल्या असता त्यांना अगोदर जमीन मोजण्यासाठी सांगण्यात आले. त्यामुळे शामकला गभणे यांनी भूमिअभिलेख कार्यालय मोहाडी येथे मोजणी शुल्क भरूनजमिनीची मोजणी केली.
भूमिअभिलेख कार्यालयाच्या मोजणी पत्रानुसार शामकला गभणे यांची ०.३९ आर व राघो गायधने यांची ०.७ आर जागा नहरात संपादीत झाल्याचे दर्शविण्यात आले आहे. मोजणी पत्राची नक्कल घेऊन बावनथडी उपविभागात गेल्यावर तेथील संबंधित अभियंता आकांक्षा सिंग यांनी पुन्हा त्या महिला शेतकऱ्याला उडवाउडवीचे उत्तरे देवून मोजणीचे पत्र चुकीचे असल्याचे सांगून पुन्हा आम्ही मोजणी करू असे सांगून परत पाठविले.
काही दिवसानंतर पुन्हा त्या महिला शेतकरी संबंधित कार्यालयात गेल्या असता त्यांना तुमची तेवढी जागा नहरात गेली नसल्याचे सांगून ०.२७ आर जागाच नहरात गेली असल्याचे अभियंता आकांक्षा सिंग यांनी सांगितले. हे ऐकून शामकला गभणे यांना धक्काच बसला. ०.३९ आर जागा संपादीत केल्यावर सुद्धा जागा कमी संपादीत केल्याचे सांगण्यात येत असल्याने त्या महिला शेतकऱ्याची मानसिक स्थिती ढासळल्यासारखी झाली आहे.
इतर शेतकऱ्यांना संपादीत जागेचे पूर्ण पैसे देण्यात आले. मात्र शामकला गभणे यांनाच मोबदला देण्यास टाळाटाळ का करण्यात येत आहे असा प्रश्न त्यांनी पत्रपरिषदेत उपस्थितकेला. मागील एक महिन्यात १५ ते २० वेळा बावनथडी प्रकल्प उपविभागीय तुमसर येथे चकरा माराव्या लागल् या. सातबारा वर नाव वेगळे करण्यात आले.
भूमिअभिलेख कार्यालयाद्वारे जागेची मोजणी सुद्धा केली. त्यांनी जसे सांगितले तसे सर्व दस्तऐवज त्या कार्यालयात जमा केले तरी संपादीत जागेचे पैसे देण्यास अभियंता आकांक्षा सिंग या टाळाटाळ करीत आहेत असा आरोप त्यांनी पत्रपरिषदेत केला असून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण त्यांनी येथीलआमदार चरण वाघमारे यांना सुद्धा सांगितले व आमदारांनी संपूर्ण कागदपत्रे तपासून ०.३९ आर जागेचा मोबदला देण्याच्या सूचना सुद्धा अभियंता आकांक्षा सिंग यांना केल्या. मात्र अभियंता सिंग यांनी आमदारांच्या सूचना सुद्धा केराच्या टोपल्यात टाकल्या व ०.३९ हेक्टर आर जागेचा मोबदला देण्यासाठी स्पष्ट नकार दिला. बावनथडी उजवा कालवा उपविभाग तुमसरचे सहाय्यक अभियंता आकांक्षा सिंग यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकांवर तीन वेळा संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Web Title: Avoid making money for land acquisition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.