शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

आॅटोरिक्षा बंदचा प्रवाशांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 00:03 IST

लोकवाहिनी म्हणून रस्त्यावर धावणाऱ्या प्रवासी आॅटोरिक्षा चालक गुरुवारला नागपूर येथील मोर्चात सहभागी झाल्यामुळे आॅटोअभावी भंडारा शहरात प्रवाशांची तारांबळ उडाली.

ठळक मुद्देएसटी गर्दीने फुल्ल : वरठी - भंडारा मार्गावर प्रवाशांची तारांबळ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा/वरठी : लोकवाहिनी म्हणून रस्त्यावर धावणाऱ्या प्रवासी आॅटोरिक्षा चालक गुरुवारला नागपूर येथील मोर्चात सहभागी झाल्यामुळे आॅटोअभावी भंडारा शहरात प्रवाशांची तारांबळ उडाली. वरठी-भंडारा रेल्वे मार्गावर सर्वाधिक धावणारे आॅटो रिक्षांची वाहतूक ठप्प पडल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसला.गुरुवारला विधानभवनावर मोर्चात आॅटोरिक्षा चालकांनी सहभाग घेतल्यामुळे वर्दळीने धावणारा रस्ता शांत होता. आॅटो रिक्षावर अवलंबून असणाºया प्रवाशांची गैरसोय झाली. नियमित धावणाऱ्या आॅटो रिक्षा अचानक गायब झाल्यामुळे एसटी हाऊसफुल्ल धावताना दिसल्या. एरव्ही एसटीचा प्रवास पसंत करणाºया प्रवाशांना लोंबकळत प्रवास करावा लागला. नोकरी करणारे व कार्यालयीन कामामुळे जिल्हा ठिकाणी प्रवास करणारे बस तथा रेल्वे प्रवाशी मोठ्या प्रमाणात आॅटोरिक्षांचा वापर करतात. शाळेत जाणाºया मुलांनाही अडचणी आल्या. गुरूवार सकाळपासूनच रस्त्यावरून आॅटो रिक्षा गायब असल्यामुळे अनेकांची धांदल उडाली.विदर्भ आॅटोरिक्षा चालक मालक संघाच्यावतीने गुरूवारी विधानभवनवर मोर्चाचे आयोजन केले होते. वरठी चालक मालक संघाचे अध्यक्ष राधेश्याम पडोळे, सचिव अरुण हिरेखन, कोषाध्यक्ष संजय हटवार, सदस्य अजय रामटेके, ज्ञानेश्वर उपथले, कमलेश खरवडे, ज्ञानेश्वर वैद्य व लाला लांजेवार यांच्या नेतृत्वात वरठी-भंडारा मार्गावर धावणाºया आॅटो चालक व मालक आंदोलनात सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांची झाली गैरसोयआॅटो रिक्षा बंद असल्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे नियमित एसटी सवलत पासने प्रवास करणाऱ्या विध्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. अनेकांना धक्काबुक्की सहन करावी लागली. बसेस फुल्ल असल्यामुळे विध्यार्थ्यांना शाळा वेळापत्रक सांभाळता आले नाही. बसेसच्या तुलनेत वाढलेली गर्दी विध्यार्थ्यांना आज अडचणीची ठरली.मोर्चेकऱ्यांमुळे रेल्वे फुल्लहिवाळी अधिवेशन काळात रेल्वेने नियमित प्रवास करणे म्हणजे डोकेदुखी ठरते. असाच अनुभव सध्या रेल्वे गाड्यांबाबत येत आहे. सकाळच्या सत्रात गोंदियामार्गे नागपूरला पोहोचणाºया सर्व गाड्या मोर्चेकऱ्यांनी हाऊसफुल्ल धावताना दिसत आहेत. अधिवेशन काळात जास्तीत जास्त मोर्चे नेण्याच्या भानगडीत एकाच दिवशी अनेक मोर्चे असल्यामुळे चारही बाजूने प्रवाशाची गर्दी वाढली.प्रवाशांना भुर्दंडभंडारा-वरठी मार्गावर २५० आॅटो रिक्षा धावतात. आज संपामुळे आॅटो रिक्षा नसल्यामुळे प्रवाशांना मिळेल त्या साधनांची प्रवास करावा लागला. रेल्वे ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जवळपास दोन किलोमीटर अंतर पायी जाऊन मुख्य मार्गाहून अन्य साधनांच्या मदतीने प्रवास करावा लागला. कधीही न दिसणारी गर्दी मोठ्या प्रमाणात एस टी स्टॅन्डवर दिसत होती. प्रवाशी मिळेल त्या साधनाने व मागेल ती किंमत मोजून गंतव्य स्थान गाठले.