हावडा मार्गावरील स्वयंचलित सिग्नल प्रणाली कुचकामी
By Admin | Updated: February 19, 2015 00:29 IST2015-02-19T00:29:46+5:302015-02-19T00:29:46+5:30
तुमसर रोड रेल्वे क्रॉसिंगवरील रेल्वे फाटक रेल्वेगाडी येण्याच्या कितीतरी आधीच बंद केली जाते. आॅटोमेटीक सिग्नल प्रणाली असल्याने ठराविक रेल्वे स्थानकादरम्यान ...

हावडा मार्गावरील स्वयंचलित सिग्नल प्रणाली कुचकामी
तुमसर : तुमसर रोड रेल्वे क्रॉसिंगवरील रेल्वे फाटक रेल्वेगाडी येण्याच्या कितीतरी आधीच बंद केली जाते. आॅटोमेटीक सिग्नल प्रणाली असल्याने ठराविक रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे आल्यानंतर फाटक बंद करावे लागते. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले कर्मचारी आधीच फाटक बंद करतात. यामुळे १५ ते २५ मिनिटे ही फाटक बंद राहते. मंगळवारी यामुळे एका रुग्णाला याचा फटका बसला.
मुंबई हावडा रेल्वे प्रमुख मार्ग व तुमसर गोंदिया रामटेक राज्य महामार्गावर तुमसर रोड येथे रेल्वे क्रॉसिंग क्रमांक ५३२ आहे. येथील फाटक १५ ते २५ मिनिटे बंद राहते. रेल्वेने आॅटोमेटीक सिग्नल प्रणाली येथे सुरु केली आहे. ही फाटक मुख्य आहे. कोका - मांढळ तथा देव्हाडा - मुंडीकोटा दरम्यान रेल्वेगाडी आल्यानंतर ही फाटक बंद केली जाते. त्यामुळे ८ ते १० मिनिटात फाटक उघडली जाते. दोन रेल्वेगाड्या एका वेळी क्रॉस झाल्या तर १० ते १२ मिनिटे येथे लागतात. परंतु सर्वसाधारण ही फाटक १५ ते २५ मिनिटे अनेकवेळा बंद राहते. दरम्यान वाहतुकीची प्रचंड कोंडी येथे निर्माण होते.
नियमानुसार साधारणत कोका - मांढळ व देव्हाडा - मुंडीकोटा दोन्ही बाजूला रेल्वे गाडी येण्यापूर्वीच ही फाटक बंद केली जाते. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले रेल्वे कर्मचारी फाटकावर कर्तव्य पार पाडत आहेत. रेल्वे गाडी ठराविक स्थानावर येण्यापूर्वीच फाटक बंद करतात. मंगळवारी १०.३० ते ११ च्या दरम्यान ही फाटक सुमारे २५ मिनिटे सतत बंद होती. दोन रेल्वेगाड्या दरम्यान येथून गेल्या एका रुग्णाला या बंद फाटकाचा फटका बसला. रुग्ण अत्यवस्थ होता. रेल्वे कर्मचाऱ्यांची जबाबदारी व त्यांच्या कर्तव्याकडे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमित लक्ष देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)