आॅटो उलटला, १५ जखमी

By Admin | Updated: April 24, 2015 00:25 IST2015-04-24T00:25:01+5:302015-04-24T00:25:01+5:30

निलजहून वांगीकडे प्रवाशी घेऊन जाणारा आॅटो उलटल्याने पंधरा प्रवासी जखमी झाल्याची घटना वांगी येथे काल रात्रीच्या सुमारास घडली.

Auto rises, 15 injured | आॅटो उलटला, १५ जखमी

आॅटो उलटला, १५ जखमी

साकोली : निलजहून वांगीकडे प्रवाशी घेऊन जाणारा आॅटो उलटल्याने पंधरा प्रवासी जखमी झाल्याची घटना वांगी येथे काल रात्रीच्या सुमारास घडली. यातील पाच जखमींना साकोलीतील उपजिल्हा रूग्णालयात तर उर्वरीत जखमींना सडक अर्जुनी येथे हलविण्यात आले. या घटनेची नोंद साकोली पोलीस ठाण्यात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
चिंतामण बोरकर (६५) रा.बाम्हणी, पौर्णिमा शामकुवर (२७), तनुजा शामकुवर (४), शिशुकला शामकुवर (५५) तिन्ही रा.सुंदरी व वच्छला बन्सोड (३२) रा.सोनी अशी उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांची नावे आहेत. पोलिसांनी रुग्णालयाच्या मेमोवरून जखमींची अपघाताच्या रजिस्टवर नोंद केली असली तरी आॅटोचालकावर कुठलाही गुन्हा नोंदविला नाही. परिणामी आॅटोचा नंबर, आॅटोचालक कोण याचा पत्ता नाही. घटनेला जवळपास २० तास लोटले तरीही पोलीस गप्प का असा प्रश्न निर्माण होत आहे. (तालुका प्रतिनिधी)

रेतीचा टिप्पर उलटला, दोन जखमी
करडी (पालोरा) : देव्हाडीहून नागपुरला रेती भरून जात असलेला टिप्पर उलटल्याने दोन जण जखमी झाले. ही घटना आज सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास तुमसर तिरोडा राज्य मार्गावरील देव्हाडी खुर्द गावाजवळ घडली. यात योगेश पुरूषोत्तम तिवारी (३५) रा. नागपूर व जयकुमार सुरेश रा. विजयनगर हे जखमी झाले. दोघांनाही भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टिप्पर क्रमांक एमएच ३१ बीएस २६८६ असून करडी पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. तपास सहायक फौजदार अश्विनकुमार मेहर करीत आहे.

ट्रकची एसटीला धडक
एसटी चालक कारधा टी-पॉर्इंटहून भंडाराकडे वाहन आणत असताना ट्रकने एसटीला धडक दिली. ही घटना काल बुधवारी रात्री ७.४० च्या सुमारास घडली. यात सुदैवाने कुणालाही जीवितहानी झाली नाही. मात्र यात बसचे नुकसान झाले.

Web Title: Auto rises, 15 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.