शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय कृषी अधिकाऱ्यांना खोलमारा येथील कारले बागेचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2022 05:00 IST

कितीही भाजीपाला खोलमारा येथील शेतकऱ्यांनी पिकविला तरी हमखास विक्रीची व दराची काळजी नसते. शेतकऱ्यांच्या दारात व्यापारी सन्मानाने उभा राहतो. येथील भाजीपाला उत्पादक शेतकरी प्रगती पथावर असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आदर्श ठरलेला आहे. सरपंच अमृत मदनकर यांचे महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी विभागाच्यावतीने शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून सन्मानसुद्धा करण्यात आले आहे. 

मुखरू बागडेलोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : पारंपरिक ज्ञानाला नव्या तंत्राची जोड देत कारल्याची यांत्रिक शेती   चुलबंद खोऱ्यातील खोलमारा येथे प्रगतिपथावर आहे. तंत्रशुद्ध व शास्त्रोक्त पद्धतीने कारले पिकाची बाग भरउन्हाळ्यातही हिरवीगार दिसत आहे. दररोज हजारो किलो कारले जिल्ह्यातील बीटीबी येथे विक्रीला जात आहे. शेतकऱ्यांची तळमळ अनुभवण्यासाठी विभागीय कृषी अधिकारी रवींद्र भोसले यांनी आपल्या टीमसह कारले बागेत हजेरी लावली.शेती परवडत नसल्याची ओरड सगळीकडूनच ऐकायला येते. पिकविणे सोपे असले तरी विकणे खूप अडचणीचे असते. परंतु लाखनी तालुक्यातील खोलमारा येथील शेतकऱ्यांनी अत्याधुनिक पद्धतीने कारले पीक उत्पादित करीत हमखास भाव व नगदी रुपये देणारी भंडारा येथील बीटीबी सब्जी मंडी शेतकऱ्यांना फलदायी ठरली. कितीही भाजीपाला खोलमारा येथील शेतकऱ्यांनी पिकविला तरी हमखास विक्रीची व दराची काळजी नसते. शेतकऱ्यांच्या दारात व्यापारी सन्मानाने उभा राहतो. येथील भाजीपाला उत्पादक शेतकरी प्रगती पथावर असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आदर्श ठरलेला आहे. सरपंच अमृत मदनकर यांचे महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी विभागाच्यावतीने शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून सन्मानसुद्धा करण्यात आले आहे. शाळा समितीचे अध्यक्ष तथा प्रगतशील शेतकरी दुर्गेश कांबळे यांची कारले पिकाची बाग कृषी अधिकाऱ्यांना भुरळ घातल्याशिवाय राहत नाही. लाखनी तालुक्यातील चुलबंध खोऱ्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहे. त्यांच्या भाजीपाल्याला व्यापाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद मिळत असल्याने त्यांच्यात पीक उत्पादन वाढीस चालना मिळत आहे. पीक उत्पादनात वाढ व्हावी यासाठी लाखनी तालुका कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे. या मार्गदर्शनाचा फायदा पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांना झाला असल्याचे सांगण्यात आले.

२०० एकरात भाजीपाल्याचे मळे- खोलमारा येथे सर्वाधिक कारले, चवळी, मिरची, टरबूज, भेंडी आदींचे भरघोष उत्पादन घेतले जाते. संपूर्ण गावाशेजारी कारल्याचे मळे आकर्षक दिसत आहेत. सदाबहार हिरवे कारल्याचे मळे कॅलिफोर्निया, इस्त्राईल देशाची आठवण करून देते. संपूर्ण गाव भाजीपाला उत्पादनात व्यस्त आहे. सुमारे दोनशे एकरात भाजीपाल्याचे सुमार उत्पादन भंडारा जिल्ह्यात प्रशंसनीय आहे. कारले बागेला विभागीय कृषी आयुक्त सोबत उपविभागीय कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे, तालुका कृषी अधिकारी सागर ढवळे, मंडळ कृषी अधिकारी हुकुमचंद रामटेके, कृषी पर्यवेक्षक श्रीकांत सपाटे, चंदन मेश्राम कृषी सहाय्यक वि.भा. शिवणकर यांनी हजेरी लावली.

खोलमारा येथील बागायत शेतकऱ्यांचे कृषी क्षेत्रातील अभ्यास व मेहनत निश्चितच प्रशंसनीय आहे. अमृत मदनकर व दुर्गेश कांबळे यांनी गावाला दिलेला आदर्श वाखाणण्याजोगा आहे. यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घेत कमी पाण्यात व्यवस्थित नियोजन करून कारखान्याप्रमाणे भाजीपाल्याचे उत्पन्न घेतले आहे. संपूर्ण गावच भाजीपाला उत्पादनात अग्रेसर आहे.-रवींद्र भोसले, विभागीय कृषी अधिकारी, नागपूर

 

टॅग्स :agricultureशेती