पाण्यासाठी नगर पंचायतवर हल्लाबोल

By Admin | Updated: July 29, 2016 00:38 IST2016-07-29T00:38:43+5:302016-07-29T00:38:43+5:30

मोहाडी येथील नळाला येत असलेल्या गढूळ पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे....

Attack on Pani Nagar Panchayat | पाण्यासाठी नगर पंचायतवर हल्लाबोल

पाण्यासाठी नगर पंचायतवर हल्लाबोल

मोहाडीत दूषित पाण्याचा पुरवठा : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा पुढाकार
मोहाडी : मोहाडी येथील नळाला येत असलेल्या गढूळ पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंबधी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मोहाडीतर्फे नगरपंचायत कार्यालयावर हल्लाबोल करण्यात आला. यावेळी उपस्थित नगराध्यक्ष स्वाती निमजे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मात्र यावेळी एकही अधिकारी उपस्थित नव्हते.
सध्या मोहाडीतील नळांना पिवळा गढूळ व दूषित पाणी येत असल्याने लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नळाला येणारे पाणी पिण्यायोग्य नसल्याने अनेक नागरिकांना हातपंपाचे पाणी प्यावे लागत आहे.
त्यामुळे शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी तसेच शहरात सार्वजनिक खुल्या जागेत तसेच रस्त्याच्या कडेला हिरवेगार गवत वापरलेले आहे. या गवतामुळे डासांचा त्रास वाढलेला असून सरपटणारे प्राणी, साप वैगेरे गवतात लपून असतात. ज्यामुळे प्राणहानी होण्याची शक्यता असल्याने या गवतावर तननाशकाची फवारणी करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष कल्याणीताई भुरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहर अध्यक्ष सोमल गजभिये, राकाँ महिला शहर अध्यक्ष मनिषा गायधने, रामदास पराते, किशोर पातरे, रूबीना शेख, ज्योती माहालगावे, नुरजंहा शेख, कौशल्याबाई निखारे, जयश्री गायधने, मंजुषा भानारकर, वनीता पारधी, कविता गजभिये, बाळु तरारे, प्रमोद भानारकर, देवकाबाई पारधी, महेश पारधी, कपील पारधी, थगबागडे, आकाश डेकाटे, विपुल भानारकर, असलम पठाण, इमरान पठाण, संदेश लोणारे, धनराज तरारे, जितु सोनवाने, महेंद्र पारधी, कदीर शेख, मोहित पारधी, शंकर भुते, शैलेश मेंढे, मिनाझ शेख, दानीश शेख, लकी शेख, आफताब कुरेशी, पंकज निमजे, वैभव डोंगरे, प्रणय सोनकुसरे आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
नगरपंचायत मोहाडी येथे लेखापाल चौधरी व अभियंता नागदेवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र हे दोन्ही अधिकारी आठवड्यातून फक्त दोनच दिवस मोहाडी येथे येतात व फक्त एक दोन तास थांबून निघुन जातात. त्यामुळे नागरिकांना आठ दहा दिवसांची वाट बघावी लागते. नगरसेवकांना सुद्धा त्यांची वाट पाहात थांबावे लागते.
या अधिकाऱ्यांनी ठरलेल्या दिवशी संपूर्ण दिवसभर येथे उपस्थित राहावे, अशी मागणी आहे. पाण्यासारख्या ज्वलंत मुद्यावर नगरपंचायत प्रशासन गंभीर नाही, अशी चर्चाही शहरात सुरू आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)

 

Web Title: Attack on Pani Nagar Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.