ंमध्यरात्री बिबट्याचा गाईवर हल्ला

By Admin | Updated: August 22, 2015 01:00 IST2015-08-22T01:00:14+5:302015-08-22T01:00:14+5:30

येरली येथे मध्यरात्री गायीच्या गोठ्यात एका बिबट्याने गायींवर हल्ला केला यात एक गाय गंभीर जखमी झाली.

The attack on Leopard | ंमध्यरात्री बिबट्याचा गाईवर हल्ला

ंमध्यरात्री बिबट्याचा गाईवर हल्ला

तुमसर : येरली येथे मध्यरात्री गायीच्या गोठ्यात एका बिबट्याने गायींवर हल्ला केला यात एक गाय गंभीर जखमी झाली. ही घटना बुधवारी भवन राहांगडाले यांच्या घरी घडली. यामुळे येरली गावात भितीचे सावट आहे. रहांगडाले यांच्या घराजवळ हाकेच्या अंतरावर निवासी आश्रमशाळा असल्याने विद्यार्थ्यांत दहशत पसरली आहे.
येरली भवन रहांगडाले यांच्याकडे पाच ते सहा गायी गोठ्यात बांधल्या होत्या. बुधवारी मध्यरात्री दावेझरी जंगलातून एका बिबट्याने गोठयात प्रवेश केला. एका गायीवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्लयात दुसऱ्या गायी बिथरल्या. मोठ्याने आवाज आल्याने भवन रहांगडाले यांचे कुटूंबीय जागे झाले. गायीच्या पायावर ओरबडल्याचे त्यांना दिसले.
गुरुवार तुमसर वनविभागाचे वनरक्षक राहांगडाले यांचे घरी जावुन चौकशी केली. बिबट्याने हल्ला केल्याचे प्रथमदर्शी त्यांना आढळले. राहांगडाले यांच्या घरातून हाकेच्या अंतरावर निवासी आश्रमशाळा आहे. आश्रमशाळेला आवारभिंत आहे. सुरक्षेच्या सर्व उपाययोजना येथे आहेत. परंतु विद्यार्थी व ग्रामस्थांत भितीचे सावट आहे. गायीवर प्रथमोपचार करण्यात आले. वनविभागाने गावाजवळ पिंजरा लावण्याची येथे गरज आहे. यासंदर्भात तुमसर येथील क्षेत्र सहायक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या हल्ल्यातील जखमी गायींवर प्रथमोपचार आले, पंरतु आर्थिक मदत देण्याचा नियम नाही. रहांगडाले यांच्या घरी वनरक्षकांनी भेट दिली. बिबट कुणालाच दिसला नाही. बिबट लहान असावा असा अंदाज आहे’, अशी प्रतिक्रिया दिली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे गावात मात्र दहशत पसरली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The attack on Leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.