दिघोरी ग्रामपंचायतीवर मजुरांचा हल्लाबोल

By Admin | Updated: April 24, 2015 00:37 IST2015-04-24T00:37:56+5:302015-04-24T00:37:56+5:30

मजुरांना किमान १०० दिवस शासनाच्या वतीने काम मिळावा, या उदत्त हेतूने शासनाने ग्रामीण रोजगार हमी योजना अंमलात आणली.

Attack the laborers on Dighori Gram Panchayat | दिघोरी ग्रामपंचायतीवर मजुरांचा हल्लाबोल

दिघोरी ग्रामपंचायतीवर मजुरांचा हल्लाबोल


दिघोरी/ मोठी : मजुरांना किमान १०० दिवस शासनाच्या वतीने काम मिळावा, या उदत्त हेतूने शासनाने ग्रामीण रोजगार हमी योजना अंमलात आणली. या अनुषंगाने दिघोरीत मागील आठ दिवसांपासून रोजगार हमी योजनेचे काम सुरु आहे. आठ दिवसात केलेल्या कामाचे मोजमाप संबंधीत कर्मचारी व अधिकाऱ्यांना केल्यावर केलेल्या कामाची मजुरी फक्त १५ ते २० रुपये मिळणार असल्याचे एका अधिकाऱ्याने मजुरांना सांगितले. दरम्यान मजुरांमध्ये कमालीचा असंतोष पसरला त्यामुळे सर्व मजूरांनी त्वरित काम बंद करुन ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला.
एकाच वेळी हजारोंच्या संख्येने मजुरांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेल्याने प्रशासन हादरुन गेले. दरवर्षी रोजगार हमी योजनेत मजुराना किमान शंभर ते १८० चे दरम्यान रोजी मिळत होती. मात्र यावर्षी २० रुपये रोजी कशी काय मिळणार याबाबत मजुरांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला. शासकीय दरानुसार रोजगार हमी योजनेच्या कामावर मजूरांना किमान १८१ रुपये रोजी मिळायला हवी. मात्र दिघोरीत मागील आठ दिवसापासून सुरु असलेल्या कामाला फक्त २० रुपये रोजी मिळणार असल्याचे तांत्रिक अधिकारी रोहयो बबलू तरजुले यांनी सांगितले असल्याचे मजुरांमध्ये चर्चा दिसून येत आहे.
मजुरांना शासकीय दरानुसार १८१ रुपये मजुरी मिळावी, यासाठी ग्रामपंचायतीवर हल्लाबोल केला व एवढी मजुरी न मिळाल्यास ग्रामपंचायतीसमोर ढिय्या आंदोलन मजुर करणार असल्याचे चर्चेवरुन लक्षात आले.
सदर प्रतिनिधीने मजुरांशी संवाद साधला असता त्यांनी भरपूर मजुरी मिळावी यासाठी उत्कृष्ठ कामे केली. त्यामुळे मोजमाप केल्यानंतरही मजुराना कमी मजुरी कशी मिळेल. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. (वार्ताहर)

Web Title: Attack the laborers on Dighori Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.